शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
2
Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
3
T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात वाईट दिवस; वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
4
"मी फक्त म्हातारी नाही, तर तरुण मुलाला..."; 12 वर्षांचं अंतर, मलायकाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
5
Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"
6
नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!
7
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
8
'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज
9
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
10
कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."
11
Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई
12
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
13
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
14
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
15
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
17
Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल!
18
"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य
19
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
20
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा

कोल्हापूर : पंचगंगा वाचविण्यासाठी कुरुंदवाडपासून पायी लोकजागर उपक्रमास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:52 PM

भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.

ठळक मुद्देपंचगंगा वाचविण्यासाठी कुरुंदवाडपासून पायी लोकजागर उपक्रमास प्रारंभडॉ. बुधाजीराव मुळीक, आमदार उल्हास पाटील, धैर्यशील माने सहभागी भूमाता संघटनेच्या रौप्यमहोत्सव, नदीच्या संगमापासून उगमापर्यंत पदयात्रा

कोल्हापूर/शिरोळ : भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.संगम ते उगम पंचगंगा प्रदुषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ आज सकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळावरुन झाला.

या जागर मोहिमेत संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, शालिनी मुळीक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी माने यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. दुपारच्या सत्रात साताऱ्याचे खासदार उदयनराजे सहभागी होणार आहेत.भूमाता संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही मोहिम संघटनेने उघडली आहे. इचलकरंजी, वळिवडे या मार्गे नदीकाठावरून पायी चालत जाऊन नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रयाग चिखली येथे नदीच्या उगमापर्यंत ७ जानेवारीपर्र्यत हा उपक्रम सुरु राहणार आहे.पंचगंगा नदीला मरणासन्न अवस्थेतून गतवैभवाकडे नेण्यासाठी प्रदूषणाची नदीकाठची ठिकाणे संगमापासून उगमापर्यंत सर्वांनी पाहावीत आणि आपण स्वत: या प्रदूषणात सहभागी होणार नाही, याची जाणीव व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे.नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रदूषण रोखणे हाच एकमेव उपाय आहे, त्यासाठी भूमाता संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जागरयात्रा हा त्यापैकीच एक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून नदी स्वच्छ कशी करता येईल, या बाबतीत प्रबोधन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी दिली.मानवी साखळी २२ किलोमीटरची या लोकजागर यात्रेत शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, नांदणी, धरणगुत्ती आदी परिसरातील शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकही सहभागी झाले आहेत. कुरुंदवाड येथील सेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळावरुन या यात्रेस प्रारंभ झाला. तेथून नृसिंहवाडीच्या नदीघाटापासून २२ किलोमीटर लांब मानवी साखळीद्वारे या पंचगंगा नदी प्रदूषण जागर करण्यात आला.पदयात्रेच्या अग्रभागी जलकुंभया मोहिमेसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या अग्रभागी पंचगंगा नदीतील पाण्याचा जलकुंभ एका सजवलेल्या वाहनावर ठेवण्यात आला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करा, पाणी वाचवा अशा आशयाच्या घोषणा देत तसेच जागृती करणारे फलक हाती घेत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर