तारांकित प्रश्नफुटीची होणार चौकशी, अजित पवारांनी उपस्थित केला मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:09 IST2018-03-28T05:09:35+5:302018-03-28T05:09:35+5:30
काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला विधानसभेत येण्यापूर्वीच पाय फुटल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल

तारांकित प्रश्नफुटीची होणार चौकशी, अजित पवारांनी उपस्थित केला मुद्दा
गणेश देशमुख
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला विधानसभेत येण्यापूर्वीच पाय फुटल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश मंगळवारी दिले.
‘लोकमत’ने यासंबंधी २३ मार्चच्या अंकात ‘तारांकित प्रश्नाला फुटले पाय’ या मथळ्याचे वृृत्त प्रकाशित करून विधीमंडळाच्या गोपनीयतेचा भंग करणारी ही घटना उघडकीस आणली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी सभागृहात
शुन्य तासात ‘लोकमत’ची
बातमीच वाचून दाखविली. विधिमंडळ सदस्यांनी विचारलेले
प्रश्न पटलावर येण्यापूर्वीच ते परस्पर जाहीर होणे ही गंभीर बाब
असून सदस्यांच्या हक्कावर गदा आणणारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यापैकी कुणी केले प्रश्न ‘लीक’?
विधिमंडळाच्या प्रधान सचिवांच्या नावाने तारांकित
प्रश्न पाठविले जातात. त्या प्रश्नांसंबंधी प्रधान सचिवच
संबंधित खात्याकडून पत्रव्यवहाराद्वारे माहिती मागवितात. त्याआधारे मंत्र्यांनी द्यावयाचे उत्तर तयार केले जाते.
ही सर्व प्रक्रिया सभागृहाच्या विशेषाधिकाराशी संबंधित असल्यामुळे प्रश्न पटलावर
येईपर्यंत त्यासंबंधीे दस्तऐवज
‘लीक’ होऊ नये, हे अपेक्षित आहे. या प्रकरणात गृह आणि बांधकाम खात्यासंबंधी विचारलेला प्रश्न
लीक झाला आहे. त्यामुळे विधिमंडळाचे प्रशासन, गृह
विभाग आणि बांधकाम खात्याचे प्रशासन यापैकी नेमके कुणी हे दस्तऐवज लीक केले, हे चौकशीतून पुढे येईल. या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.