घटनात्मक चौकटीत राहून मोठे काम करून दाखवेन
By Admin | Updated: August 18, 2014 03:51 IST2014-08-18T03:51:14+5:302014-08-18T03:51:14+5:30
नाईक म्हणाले, कोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले.

घटनात्मक चौकटीत राहून मोठे काम करून दाखवेन
कोल्हापूर : पट्टणकुडी ते सांगली, अकौंटंटपासून राज्यपाल, पाच वेळा आमदार अन् तीन वेळा खासदार, दहा निवडणुकांत दोन वेळा पराभव अशा अनेक चढउताराचा प्रवास करून राजकारणातील वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल सुरू आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी रविवारी येथे सर्वपक्षीय नागरी सत्काराप्रसंगी जीवनपट उलगडून दाखविला. राज्यपाल हे पेन्शनरसाठीचे पद नसून घटनात्मक चौकटीत राहून मोठे काम करता येते हे दाखवून देऊ, असे ते म्हणाले.
मी कोल्हापुरी असल्याचा मला अभिमान आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. नाईक म्हणाले, कोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. वडील मुख्याध्यापक असल्याने शालेय जीवनात लागलेली शिस्त व नित्यनियमाने सूर्यनमस्कार घालण्याची सवय यामुळेच कर्करोगावरही मात करू शकलो. संसदेत ‘वंदे मातरम्’ सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचा आनंद आयुष्यभर राहील. (प्रतिनिधी)