जालना - सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जालना येथे एका सभेला संबोधित करताना ''तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन,'' असे वक्तव्य दानवे यांनी केले असून, त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी जालना येथे विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेत आणि मला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत. आता तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन.'' असे वक्तव्य दानवे यांनी केले.
तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 12:32 IST
सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
ठळक मुद्दे''तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन,'' असे वक्तव्य दानवे यांनी केले 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेतमला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत