वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ, डॉ. बाबा आढाव यांचा एसटी संपाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 09:39 PM2017-10-19T21:39:02+5:302017-10-19T23:32:05+5:30

एसटी कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नाही, असे सांगत वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ आहे, असे सांगणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

ST workers will not negotiate without retrospectively, Dr. Baba Adhav's support to ST's movement | वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ, डॉ. बाबा आढाव यांचा एसटी संपाला पाठिंबा

वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ, डॉ. बाबा आढाव यांचा एसटी संपाला पाठिंबा

Next

पुणे- एसटी कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नाही, असे सांगत वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ आहे, असे सांगणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
एसटी कामगारांचा संप सुरू झाल्यानंतर गुुरुवारी सायंकाळी त्यांनी स्वारगेट एसटी बस स्थानकाला भेट देऊन कामगारांशी चर्चा केली.  यावेळी ते म्हणाले, सरकारने चर्चेला नेहमीच तयारी दर्शविली पाहिजे. वाटाघाटीचा दरवाजा बंद करणारे हे कोण आहेत. कामगार न्याय मागत आहेत. सर्वांना समान श्रेणी मागतात, असे बोलणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या देण्यासारखे आहे. खेडोपाडी, ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षण, आरोग्यासाठी हेच एसटी कामगार बस चालवितात. अशा प्रकारे बोलणे म्हणजे सरकारने यांना चिरण्यासारखेच भूमिका आहे. त्यामुळे आम्ही आमचे वय विसरून या कामगारांच्या हक्कासाठी आलो आहोत. सरकारनेही तात्काळ या संपाचा निकाल लावावा व जनतेचे हाल थांबविले पाहिजे. सरकारचे काम मिटविणे हे आहे. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांनी आपल्या बायका मुलांनाही त्यात सामील करून घ्यावे.

Web Title: ST workers will not negotiate without retrospectively, Dr. Baba Adhav's support to ST's movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.