शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ST Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय २० तारखेनंतर; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 06:11 IST

सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं परब यांचं वक्तव्य.

मुंबई : एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला २० डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात आपले प्राथमिक म्हणणे मांडायचे आहे. त्या अनुषंगाने सर्व कायदेशीर चर्चा सुरू आहे. शिवाय, संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावायचा की नाही, यावरही चर्चा सुरू असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे तूर्तास २० तारखेपर्यंत मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कर्मचाऱ्यांचा संप, न्यायालयातील सुनावणी आदींवर चर्चा झाली. यानंतर परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने समिती नेमली आहे. त्याला १२ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर २० तारखेला प्राथमिक मत काय आहे याबाबतचा अहवालही मागितला. या सर्व कायदेशीर बाबींच्या चर्चेसाठी आजची बैठक होती, असे त्यांनी सांगितले. कामावर न परतलेल्या दहा हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे, तर अडीच हजार कंत्राटी कामगारांच्या सेवा समाप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

६३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसविलीनीकरणाच्या मागणीवर  गेल्या दीड महिन्यापासून ठाम असलेल्या  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. एसटी महामंडळाने शुक्रवारी २२ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ आणि ५०  कर्मचाऱ्यांना निलंबित केले. आतापर्यंत दहा हजार निलंबित कर्मचाऱ्यांपैकी ६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता एकूण

आकडा ३५५ इतका झाला आहे.

  • वेतनवाढ देऊनही संप मागे न घेतल्याने एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील २ हजार ५५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १० हजार ७०१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. 
  • १० हजार १८० निलंबित कामगारांना सोमवारपर्यंत शेवटची संधी देण्यात आली होती. त्यातून सोमवारी फक्त १४९ निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आता  निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी महामंडळाने २२ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

५१ कर्मचारी निलंबितगेल्या ५० दिवसांत एसटी महामंडळाकडून आतापर्यत  १० हजार ७०१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर एसटी महामंडळाने शुक्रवारी ५१ एसटी कर्मचारी निलंबित केले असून, २२ निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४४ इतकी झाली आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परबST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र