शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ धावणार आरोग्य सेवेत; पहिले रुग्णालय सांगवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:20 IST

वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणीही प्रस्तावित

- राजानंद मोरे पुणे : राज्यातील लाखो प्रवाशांची सेवा करण्याबरोबरच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) गाडी आरोग्य सेवेतही सुसाट धावणार आहे. एसटीचे राज्यातील पहिले रुग्णालय पुण्यातील सांगवी येथे उभारण्यात येईल. शंभर खाटांच्या या रुग्णालयासोबतच वैद्यकीय महाविद्यालयही प्रस्तावित आहे. त्याबाबतची प्रक्रियाही नुकतीच सुरू करण्यात आली आहे.एसटी महामंडळाची पुणे ते अहमदनगर मार्गावर १९४८मध्ये पहिली बस धावली. या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या ७० वर्षांमध्ये एसटी महामंडळाची सेवा कोट्यवधी प्रवाशांपर्यंत पोहोचली. दररोज हजारो बस राज्यभर प्रवाशांना सेवा देत आहेत. या काळात अनेक चढ-उतार पाहिलेल्या एसटीचे रूप मागील काही वर्षांपासून बदलत आहेत. प्रवाशांच्या सोयीनुसार अत्याधुनिक बस, अद्ययावत बस स्थानक, गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा, प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता तर एसटीने ‘ट्रॅक’ बदलला असून प्रवासी सेवेबरोबरच आरोग्य सेवेतही उडी घेतली आहे.‘एसटी’ने स्वत:च्या मालकीचे १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटीचे हे पहिले रुग्णालय सांगवी येथील एसटीच्या जागेत होणार आहे. एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालय व महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे. सांगवी येथे महामंडळाची एकूण चार हेक्टर जागा आहे. या जागेतील काही भागात सध्या एसटी कॉलनी आहे. या जागेत पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णालय बांधले जाणार आहे. त्यासाठी सुमारे पाच एकरजागा लागणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. सुमारे २० हजार ६३८ चौरस मीटर जागेत  रुग्णालयाची बांधणी केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. सध्या एसटी कॉलनी याच जागेत राहील. कॉलनी हलविण्याबाबत नियोजन नाही. सुरुवातीला वाशी येथे रुग्णालयाबाबत चर्चा झाली होती.कर्मचाऱ्यांना २५ टक्के आरक्षणएसटीच्या पहिल्या रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसटीतील सर्व कर्मचाºयांना या ठिकाणी २५ टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातील. उपचारही सवलतीच्या दरात मिळतील. तर, पुढील टप्प्यात होणाºया महाविद्यालयामध्ये सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी २५ टक्के जागा एसटीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आरक्षित असतील, असे अधिकाºयांनी सांगितले.प्रक्रियेला सुरुवातरुग्णालय उभारण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. हे रुग्णालय पीपीपी किंवा बीओटी तत्त्वावर उभारले जाणार आहे. त्यानुसार प्रकल्पाची आखणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदाविषयक कार्यवाही, विकसकाची निवड व प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्याची तज्ज्ञ व अनुभवी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. ही प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून, दि.२० आॅक्टोबर रोजी संस्थेची निवड होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळHealthआरोग्यMedicalवैद्यकीय