पाच मोबाइल अ‍ॅप्सवर मिळणार एसटीचे तिकीट

By Admin | Updated: January 13, 2015 04:56 IST2015-01-13T04:56:16+5:302015-01-13T04:56:16+5:30

प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीट सेवेत अनेक पर्याय प्रवाशांना देण्याचा निर्णय झाला आहे.

ST tickets to get five mobile apps | पाच मोबाइल अ‍ॅप्सवर मिळणार एसटीचे तिकीट

पाच मोबाइल अ‍ॅप्सवर मिळणार एसटीचे तिकीट

मुंबई : प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीट सेवेत अनेक पर्याय प्रवाशांना देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी पाच मोबाइल अ‍ॅप्सद्वारे एसटीचे तिकीट आरक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असून, त्यावर महामंडळाकडून कामही सुरू आहे. येत्या दोन आठवड्यांत ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल.
पाच मोबाइल अ‍ॅप्समध्ये सुरुवातीला ट्रॅव्हल यारी अ‍ॅपवर एसटी आरक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. ही सेवा उपलब्ध झाल्यास एसटीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची चाललेली धडपड कमी होईल आणि सहज तिकीट उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

Web Title: ST tickets to get five mobile apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.