ST suffered a loss of Rs 800 crore | एसटीला झाला आठशे कोटींचा तोटा

एसटीला झाला आठशे कोटींचा तोटा

मुंबई : एसटी महामंडळामधील बसचा वाढलेला देखभालीचा खर्च, इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि तिकीट दरवाढीत मर्यादा यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यामुळे एसटीचा २०१९-२० यादरम्यान संचित तोटा सुमारे पाच हजार कोटींवर पोहोचला आहे. यात भर म्हणून आगामी वर्षात एसटीला सुमारे आठशे कोटींचा तोटा होण्याची भीती अर्थसंकल्पात व्यक्त केली आहे.

एसटीकडूनही टोल टॅक्स तसेच प्रवासी करही वसूल केला जातो. त्याचवेळी एसटीला विविध घटकांना सवलतीच्या दरात तिकिटे द्यावी लागतात. त्याची नुकसानभरपाई एसटीला केली जात नाही. तसेच, इंधनावरही राज्य सरकार कर आकारते. याचा थेट परिणाम एसटीच्या संचित तोट्यावर पडत आहे. एसटीचा सर्व बाजूने खर्च वाढत असला तरी, एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. याचा थेट परिणाम एसटीच्या आर्थिक तोट्यात होतो. ही तूट भरून काढण्यासाठी एसटी प्रशासन कमी पडत आहे, असे मत एसटी कामगारांचे आहे. २०१९-२० यादरम्यान संचित तोटा सुमारे पाच हजार कोटींवर पोहोचला. एसटी प्रवासी वाढीदरम्यान एसटी प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे एसटीचा विस्तार खुंटला आहे.

मागील तोट्यापेक्षा ०.२४% घट अपेक्षित

राज्य परिवहन महामंडळाचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प (अंदाजित) जाहीर झाला आहे. यामध्ये एसटीला १० हजार ४६७ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या अर्थसंकल्पात एसटीला ८०२.०३ कोटींचा तोटा अपेक्षित आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ९ हजार ६६५.१४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर, ८०२.०३ कोटी रुपये तोटा होणे अपेक्षित आहे. मात्र तोटा २०१९-२० सुधारित अर्थसंकल्पात ८०३.५० कोटी रुपये होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तोट्यापेक्षा ०.२४ टक्के इतकी घट अपेक्षित आहे.

Web Title: ST suffered a loss of Rs 800 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.