शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संपाचा तिढा सुटणार; कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीचा राज्य शासनाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 06:40 IST

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात परिवहन मंत्री अनिल परब, एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यात बैठक झाली.

मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देण्याचा पर्याय राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी दिली.एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात परिवहन मंत्री अनिल परब, एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यात बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. तिच्या निर्णयाचे उल्लंघन सरकार किंवा कर्मचारी करू शकत नाहीत. बारा आठवड्यांत समितीचा अंतरिम अहवाल आधी मुख्यमंत्री आणि नंतर न्यायालयासमोर मांडला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल का, वेळेत पगार होतील का, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत अंतरिम पगारवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सरकारने दिल्याचे परब यांनी सांगितले.नेमकी किती पगारवाढ देणार याबाबत चर्चा झाली नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले. मात्र, समितीचा जो काही अहवाल येईल, तो राज्य सरकारला मान्य असेल. उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा चर्चा करण्याचे मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. अहवाल येईपर्यंत संप चालू शकत नाही. तोपर्यंत सामोपचाराने संप मिटायला हवा, असेही परब म्हणाले.

विलीनीकरणावर ठाम - पडळकरविलीनीकरणावर कर्मचारी ठाम आहेत. सरकारने मंगळवारी पहिल्यांदाच भूमिका मांडत अंतरिम पगारवाढ देऊ, असे म्हटले आहे. याबाबत आंदोलकांशी चर्चा करून बुधवारी कळवू, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. तर चर्चेच्या आणखी दोन-तीन फेऱ्या होतील, असे खोत म्हणाले.

परबांच्या बंगल्यावर शाई फेकण्याचा प्रयत्नजनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अनिल परब यांच्या बंगल्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. आमदार पडळकर यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परबGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSadabhau Khotसदाभाउ खोत Employeeकर्मचारी