शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! सोमवारपर्यंत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, अनिल परब यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 14:48 IST

'तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, पण कामावर न येणाऱ्या कामगारावर कठोर कारवाई केली जाईल.'

मुंबई: वाढीव पगारवाढ देऊनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अनेक दिवसंपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर बसले आहेत. यात काही आगारातून बस सेवा सुरू झाल्या आहेत, पण इतर आगारातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण, आता ही निलंबनाची कारवाई मागे घेण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब(anil parab) यांनी केली आहे. आज त्यांनी माध्यमांमसमोर येऊन ही मोठी घोषणा केली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची घोषणा केली. ते म्हणाले की, सरकारने कर्मचाऱ्यांची वाढीव पगार वाढीची मागणी मान्य केली. आतापर्यंत सर्वात मोठी पगारवाढ देण्यात आली. यानंतरही काही आगारातील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. पण, त्यांना आता सरकार अखेरची संधी देत आहे.

सोमवारपर्यंत वाट पाहणारपरब पुढे म्हणाले की, निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, पण त्यांना येऊ दिले जात नाही, असा आरोप करण्यात येत होता. तसेच, काहीजणांनी निलंबन मागे घेण्याची विनंतीही केली होती. या सर्व गोष्टीवर विचार केल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना अजून एक संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. जे कर्मचारी सोमवारपर्यंत सेवेत रुजू होतील, अशा सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. शिवाय, त्यांना वाढीव पगारही दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मेस्मा लावणार नाहीत, पण...

ते पुढे म्हणाले की, जिथे डेपो 50 टक्क्यांपेक्षा जास्त चालू होईल, त्यांना त्याच डेपोमध्ये काम दिलं जाईल. पण जिथे तेवढी कामगार संख्या नाही होणार, त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल. पण, आम्ही कारवाईबाबत पुढे गेलो आहोत. सोमवार नंतर कठोर कारवाई होऊ शकते. सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावं, निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावं. मला संधी दिली नाही असं वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत. कामगारांना अडवलं गेलं तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं. जेणे करून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल. तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कामगार कामावर आले नाही तर त्याहूनही कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

इतर राज्यांपेक्षा जास्त पगारवाढ दिली

ते पुढे म्हणाले की, कोर्टाने नेमलेल्या समितीसमोर विलीनीकरणाचा मुद्दा आहे. या समितीला 12 आठवड्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. कोर्टाचा निर्णय आम्हाला बांधिल आहे. मात्र, कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून तोपर्यंत चांगली पगारवाढ दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 41 टक्के पगारवाढ दिली. काही राज्यांपेक्षा जास्त पगारवाढ दिली आहे. कमी कालावधीत नोकरीला लागलेले आणि जास्त कालावधी झालेले कर्मचारी यांच्या वेतनात थोडाफार फरक आहे. पण त्यावर बसून चर्चा करता येईल, असं त्यांनी सांगितलं. 

10 हजारांवर कर्मचारी निलंबितकर्मचारी संपकाळात कामावर हजर होते त्यांना 7 डिसेंबरला वेतन अदा करण्यात आले. मात्र संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली असून बुधवारपर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. पण, आता परिवहान मंत्र्यांच्या घोषणेनंतर कर्मचारी कामावर रुजू होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब