ST Strike: एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 23:27 IST2021-11-16T23:26:42+5:302021-11-16T23:27:03+5:30
माटरगाव येथील विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) यांनी राहत्या घरी विष प्राशन केले.

ST Strike: एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
खामगाव : खामगाव बस आगारात सहाय्यक मॅकेनिकल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने माटरगाव येथे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विष प्राशन केल्याची घटना घडली.
माटरगाव येथील विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या तणावातूनच विशाल अंबलकार यांनी विष प्राशन केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.