मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एसटीला अपघात, २५ जखमी
By Admin | Updated: January 24, 2017 13:05 IST2017-01-24T13:05:44+5:302017-01-24T13:05:44+5:30
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर किवळे एक्झिटजवळ एसटी ३० फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले आहेत

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एसटीला अपघात, २५ जखमी
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - टायर पंक्चर झाल्याने बस डिव्हायडरला धडकून ३०-३५ फूट खोल खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील किवळे एक्झिट येथे मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
एसटी महामंडळाची बस बोरिवलीहून सातारा येथे जात असताना किवळे एक्झिटजवळ बसचे टायर पंक्चर झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी डिव्हायडर तोडून ३०-३५ फूट खाली कोसळली. यावेळी बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. अपघातानंतर काही प्रवासी आपात्कालिन खिडकीतून बाहेर पडले. या अपघातात एकूण २० प्रवासी जखमी झाले असून पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.