शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील एसटी सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 03:24 IST

कोल्हापूर जिल्ह्यात महापूरसदृश्य स्थिती असल्यामुळे ६ हजार १९८ फेऱ्या रद्द

मुंंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महापूरसदृश्य स्थिती असल्यामुळे ६ हजार १९८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई विभागातून बाहेरगावी जाणाºया फेºयाही रद्द केल्याने, एसटी महामंडळाला कोट्यवधीच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.राज्यात एसटी महामंडळाचे एकूण ३१ विभाग आहेत. या सर्व विभागांतून एसटीला दररोज २२ कोटींचा महसूल मिळतो. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यातील १० विभागांत मोठ्या प्रमाणात आणि ६ विभागांत किरकोळ प्रमाणात जलप्रलय आल्याने, एसटी बससेवा ठप्प झाल्या आहेत.कोल्हापूर विभागातून दररोज सरासरी ४० ते ५० लाखांचा महसूल मिळतो, तर इतर विभागातून सरासरी ३० ते ६० लाखांचा महसूल मिळतो. त्यामुळे एसटीच्या फेºया कमी झाल्याने महामंडळाला एका दिवसाला अंदाजे ३ ते ७ कोटींच्या महसुलाचा फटका बसण्याची शक्यता आहे.कोल्हापूर-सांगलीला बेटाचे स्वरूपमुसळधार पाऊस आणि पंचगंगेसह अन्य नद्यांना पूर आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले. यासह राधानगरी, वारणा, कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना बेटांचे स्वरूप आले आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे एसटी बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला, तसेच प्रवाशांची संख्या कमी झाल्याने, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी दिल्याने, एसटीच्या फेºया कमी प्रमाणात चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.कोल्हापूर आगारातील सर्व ६ हजार १९८ फेºया रद्दपरिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत कोल्हापूर विभागातून दररोज धावणाºया ६ हजार १९८ फेºयांपैकी सर्व फेºया रद्द करण्यात आल्या, तर सांगली विभागातून दररोज ४ हजार ४२४ फेºयांपैकी १ हजार ६०० फेºया रद्द केल्या आहेत. रत्नागिरी विभागातून १ हजार ८५६ फेºयांपैकी १ हजार ५६१ फेºया, तर सिंधुदुर्ग विभागातून २ हजार ६०४ फेºयांपैकी ६९५ फेºया रद्द करण्यात आल्या. मुंबई विभागातून राज्यातील विविध मार्गांवर धावणाºया ९३ फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. रायगड विभागातील अलिबाग, रोहा डेपोत पाणी साचले आहे. त्यामुळे ३ हजार ३६८ फेºयांपैकी ६६५ फेºया रद्द कराव्या लागल्या आहेत.

टॅग्स :state transportएसटीkonkanकोकणkolhapurकोल्हापूर