शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी भाडेवाढीचा निर्णय आज?

By admin | Updated: May 27, 2014 05:34 IST

एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक बोजा पडत असल्याने महामंडळाकडून जवळपास २.५0 टक्के डिझेल दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मुंबई : एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक बोजा पडत असल्याने महामंडळाकडून जवळपास २.५0 टक्के डिझेल दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्याशिवाय ही भाडेवाढ होऊ शकत नाही. यासंदर्भात एसटी महामंडळ आणि राज्य परिवहन प्राधिकरणाची मंगळवारी बैठक होणार असून भाडेवाढीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डिझेलच्या दरात नुकतीच १ रुपये ९ पैसे दरवाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत ६५ रुपये २१ पैसे तर ठाण्यात डिझेल ६५ रुपये १५ पैसे झाले. राज्यातील इतर ठिकाणीही डिझेलची किंंमत एवढीच वाढली आहे. सध्या महामंडळाला दररोज ११ ते १३ लाख लिटर डिझेल लागत असून, त्यासाठी वर्षाकाठी २00 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. आता वाढलेल्या डिझेलच्या किमतीमुळे त्यामध्ये आणखी ४ कोटी रुपयांची भर पडणार आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यास सूत्रानुसार एसटी महामंडळ भाडेवाढ करू शकते. हे पाहता महामंडळाकडून जवळपास २.५0 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. भाडेवाढ झाल्यास महामंडळाच्या तिजोरीत आणखी १00 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचे सांगितले जाते. या भाडेवाढीचा प्रस्ताव महामंडळ मंगळवारी प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर राज्य परिवहन प्राधिकरण विचारविनिमय करून भाडेवाढ तेवढ्याच पटीत योग्य आहे की नाही तसेच ती करणेदेखील किती गरजेचे आहे यावर विचार करेल आणि मगच निर्णय देईल, असे सांगण्यात आले. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, भाडेवाढीचा प्रस्ताव आला तरी तेवढ्याच भाडेवाढीला मंजुरी मिळेल हे काही सांगता येणार नाही. (प्रतिनिधी)