शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या कर्मचारी बदल्यांमध्ये सावळागोंधळ, ज्येष्ठता डावलून बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 07:36 IST

दोन वर्षांपूर्वी मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे यादीत नाव

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळात १५ टक्के बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ३७९ चालक आणि १०८ वाहकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. पण या बदल्यांमध्ये सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता, त्याचे नाव बदली यादीत आहे. तर या बदल्यांत सेवाज्येष्ठता डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.एसटी महामंडळात गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये पालघर विभागातील गोरक्षनाथ कंठाळे या कर्मचाºयाचे नाव आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता तरीही बदली यादीत नाव टाकण्यात आले आहे. काही काळापूर्वी बदली झालेल्या दहा कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. तसेच सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली आहे, असा आरोप कर्मचाºयांकडून केला जात आहे. कामगार संघटनेच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगडला बदली झालेल्या कर्मचाºयाची रायगडवरून पुन्हा अहमदनगरला बदली करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादीचे नियम डावलण्यात आले आहेत. एकत्रित सेवा ज्येष्ठता नियम लावला पाहिजे, पण विभागातील सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली आहे. हा नियम पहिल्यांदा लावण्यात आला आहे. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.कोरोनाच्या काळात मुंबई उपगनरातील अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांना एसटी बसमधून प्रवासाची सुविधा दिली जात होती. त्या वेळी मुंबईत काम न करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली होती. आजही मुंबई, रत्नागिरी, ठाणे येथे कर्मचाºयांचा तुटवडा आहे. पण तरीही या ठिकाणच्या चालक आणि वाहकांच्या मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी बदल्या करण्याचा घाट का, असा सवाल एसटी कर्मचाºयांमधून विचारला जात आहे.बदल्यांना तोपर्यंत तात्पुरती स्थगितीएसटी महामंडळाने बदल्या केल्या होत्या, पण या बदल्यांमध्ये एका मृत कर्मचाºयाचे नाव होते. तसेच काही कर्मचाºयांची पुन्हा बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.- वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र