शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार; कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 06:26 IST

MSRTC ST Employees Salary News:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क. मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित ४४  टक्के रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला आहे.

एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार मिळाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे उर्वरित पगार तत्काळ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता.  अपुऱ्या निधीमुळे केवळ ५६ टक्के पगार दिल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता या निम्म्या पगारात घर कसे चालवणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला होता. महामंडळाने शासनाकडे १ हजार ७५ कोटींच्या प्रतिपूर्ती रकमेचा प्रस्ताव पाठविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला ४०० कोटींपेक्षा जास्त आणि हातात मिळणाऱ्या वेतनासाठी २५० कोटींपेक्षा अधिक रकमेची गरज असते. शासनाकडून गेल्या महिन्याची प्रतिपूर्ती रक्कम २७२ कोटी ९६ लाख रुपये मिळाले होते. त्यातील ४० कोटी एसटी बँकेला दिले, तर काही रक्कम पीएफसाठी दिल्याने महामंडळाकडे मार्चच्या पगारासाठी १३५ कोटी उरले होते. शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने पगारासाठी पैसे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  

पगार दहा दिवसांत करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा शासनाच्या वित्त विभागाकडून महामंडळाला पुरेसा निधी देण्यात येत नाही. याला सर्वस्वी शासनाचे अर्थखाते जबाबदार आहे. येत्या १० दिवसांत पगारासाठी पैसे न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला होता.

एसटी कर्मचारी ४० ते ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात अहोरात्र काम करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. अशा परिस्थितीही संपूर्ण वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये  असंतोष आहे.  त्यामुळे तातडीने हे शंभर टक्के वेतन न दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला होता.

आधीच कमी पगार आहे. त्यामध्ये निम्मा पगार खात्यात जमा झाला. आमच्यापैकी काही जणांनी कर्ज काढून घर घेतल्याने त्याचा २० ते २२ हजारांचा हप्ता भरल्यावर आम्ही खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अरविंद निकम, एसटी चालक, मुंबई सेंट्रल आगार

एकूणच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक मेहनत एसटी कर्मचारी करतात. तरीही आम्हाला निम्मा पगार मिळाला. आम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताही मिळत नाही. त्यात पगार कापल्याने कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, घरखर्च अशा अनेक समस्या निर्माण होणार आहेत. दीपक जगदाळे, एसटी वाहक, लातूर

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेEmployeeकर्मचारी