एसटी कर्मचा-यांना कामावर तंबाखू खाण्यास मनाई
By Admin | Updated: July 30, 2016 21:53 IST2016-07-30T21:53:47+5:302016-07-30T21:53:47+5:30
एसटी महामंडळाने बस व बसस्थानके स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला असून एसटी कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे

एसटी कर्मचा-यांना कामावर तंबाखू खाण्यास मनाई
>हर्षनंदन वाघ / ऑनलाइन लोकमत -
आता बसस्थानक होणार तंबाखूमुक्त
बुलडाणा, दि. 30 - ग्रामीण भागातील लोकवाहिन्या म्हणून ओळख असणा-या एसटी महामंडळाने बस व बसस्थानके स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला असून एसटी कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे.
तंबाखू खाणा-यामुळे अनेक बसेस, बसस्थानके घाणीने माखलेले दिसून येतात. काही बसस्थानक परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे प्रवाशांना थांबणे कठिण असते. त्यामुळे एसटी बसेस, बसस्थानके व आगार परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला आहे. त्या अनुषंगाने आगारातील पानटप-या बंद करून गुटखा, पान, तंबाखू खाणा0याविरूध्द कार्यवाही केली जाणार आहे. तसेच एसटी कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली असून यापुढे तंबाखू खाणाºयास राज्य परिवहन महामंडळात नोकरी द्यायची नाही, असा निर्णयही राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र बसस्थानक परिसरात असलेल्या पानटप-या बंद करताना या पानटप-यांमध्ये पर्यायी व्यवसायाला परवानगी दिली जाणार आहे.
स्वच्छतेसाठी राज्यस्तरावर एकच निविदा बसस्थानके स्वच्छ राहण्यासाठी राज्यस्तरावर एकच निविदा काढली जाणार आहे. एसटी स्थानकाच्या परिसरात असलेली शौचालये, स्वच्छतागृहे प्रवासांसाठी असतात. मात्र त्याचा वापर परिसरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, फेरीवाले करीत असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे स्वच्छतागृहे, शौचालये ही कंत्राटी पद्धतीने सुरु केले जाणार आहेत.
शासनाच्या परिपत्रकानुसार बसस्थानक परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी करण्यात आली असून एसटी कर्मचाºयांना तंबाखू खाण्यास मनाई बाबत शासनाचे परिपत्रक व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- दीपक साळवे, आगार प्रमुख, बुलडाणा.