शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

कर्मचाऱ्यांच्या LIC चा हप्ता ST ने भरलाच नाही; मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 6:08 AM

एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. संघटनांचा सरकारला सवाल 

प्रसाद कानडेपुणे : राज्य परिवहन महामंडळाने मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीचा हप्ता कापला खरा, पण तो एलआयसीकडे भरलाच नाही. त्यामुळे या चार महिन्यांत कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. एसटीच्या ह्या भोंगळ कारभारामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन थकले नसले, तरी एलआयसीचा हप्ता न भरणे हा कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. एसटीने जवळपास २० कोटी रुपये एलआयसीकडे भरलेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. एसटी प्रशासनाने ९ कुटुंबे सोडता अन्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मदत केलेली नाही. 

२३९ कर्मचारी मृत; मदत केवळ ९ जणांनाआतापर्यंत कोरोना संसर्गामुळे एसटीच्या २३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पैकी ९ जणांना ५० लाख रुपयांचे आर्थिक साह्य केले. एलआयसीचा हप्ता थकविला त्या काळात १०० ते १५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत केलेली नाही.

जवळपास २४०० कोटी थकविलेएसटीचा आतापर्यत संचित तोटा हा ९ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. जवळपास २४०० कोटी रुपये थकविले आहे. यात एसटी बँक, एलआयसी, डिझेल , सुरक्षा, ब्रिक्स कंपनी, सेवा निवृत्त कर्मचारी आदींचा समावेश आहे.

एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पॅालिसी लॅप्स होत असलेले मेसेजेस येत आहेत. बँक सोसायटीचीही तीच अवस्था आहे. आमचे हक्काचे पैसे व त्याचा डिव्हिडंड आम्हाला मिळू शकत नाही. दुर्दैवाने मृत्यू आला तर भरपाई कोण देणार? - संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी