शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के कर्मचारी रुजू, ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:16 IST

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत. शुक्रवारी, अल्टिमेटमच्या शेवटच्या दिवशी ५,३९८ कर्मचारी रुजू झाले. आता एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले असून,  उपस्थित कर्मचाऱ्यांचा आकडा ८२,२६० वर पोहोचला आहे. त्यामुळे एसटीची ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर आली आहे. 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या चालक- वाहकांना आर्थिक लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील चालक-वाहक दिवाळीपासून बेमुदत संपावर होते. प्रवाशांची गैरसोय होत असून, ती टाळण्यासाठी कामावर रूजू व्हा, असा आदेश हायकोर्टाने दिला हाेता.

बडतर्फ कर्मचाऱ्यांना करावे लागेल अपील -- या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे  एसटी महामंडळाने कारवाई करत १०,३०८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते.  आता या कर्मचाऱ्यांना अपील करावे लागेल. - त्यांची सुनावणी झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले जाईल. २२ एप्रिलपर्यंत ९,५७७ अपिले आली असून, त्यापैकी ४,७०१ अपिले निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या अपिलाची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण झाल्यानंतर तेही रुजू हाेतील.

चार हजार कर्मचाऱ्यांनी शोधला पर्याय : एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप सुरू होता. या काळात तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी अन्य नोकरी शोधली आहे किंवा व्यवसाय सुरू केला आहे. असे तीन ते चार हजार कर्मचारी असून, ते कामावर परतणार नाहीत, अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

एसटीच्या फेऱ्या वाढल्या एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर परतले असून, कर्मचारी वाढल्याने एसटीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत...२७,५६९ - एसटी २५,७४९ - साधी १८६ - शिवनेरी२८६ - हिरकणी  ४३५ - शिवशाहीफेऱ्यांचा समावेश आहे.

उपस्थिती लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईलन्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मोठ्या संख्येने एसटीचे कर्मचारी त्या त्या आगारांमध्ये कामावर रुजू झाले आहेत. सध्या ८५ टक्के वाहतूक सुरू असून,  लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईल.  ग्रामीण भागातील आणि लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. एसटी पूर्वपदावर आली असून, राज्यातील  प्रवाशांनी आता त्याचा लाभ घ्यावा.     - शेखर चन्ने,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय     संचालक, एसटी महामंडळ 

टॅग्स :ST Strikeएसटी संपBus DriverबसचालकMaharashtraमहाराष्ट्र