ST Bus: आता आयआरसीटीसीवर एसटीचेही तिकीट करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 08:30 AM2023-09-14T08:30:08+5:302023-09-14T08:30:41+5:30

ST Bus: एसटी महामंडळाची सेवा रेल्वेच्या प्रवाशांनाही उपयोगी पडावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

ST Bus: Now book tickets for ST also on IRCTC | ST Bus: आता आयआरसीटीसीवर एसटीचेही तिकीट करा बुक

ST Bus: आता आयआरसीटीसीवर एसटीचेही तिकीट करा बुक

googlenewsNext

मुंबई - एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरूनही आरक्षण करता येणार आहे, तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांनाही सोयीची होणार आहे. कारण एसटी महामंडळाची सेवा रेल्वेच्या प्रवाशांनाही उपयोगी पडावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरून प्रवाशांना एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.

रेल्वेच्या एकूण प्रवाशी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटही आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकीय संचालक सीमा कुमार उपस्थित होत्या. 

 

 

Web Title: ST Bus: Now book tickets for ST also on IRCTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.