शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क; तब्बल २२,३८४ शाळांचा निकाल 'शत प्रतिशत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:22 IST

Maharashtra SSC Result 2021: 100 percent marks for 957 students in X results; Results of 22,384 schools '100 per cent : कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे विशेष म्हणजे या परीक्षेत तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील २२,७६७ शाळांपैकी २२,३८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

मुंबई - राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल  शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर, विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. Maharashtra SSC Result 2021: 100 percent marks for 957 students in X results; Results of 22,384 schools '100 per cent

कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्याचा निकाल ९९.९५ टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये कोकणा विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून पुणे विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९९.६५ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील २२,७६७ शाळांपैकी २२,३८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

असा बनविण्यात आला निकाल

राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.  

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झालेला निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

विभागिय मंडळ निहाय निकालपुणे  : ९९.६५नागपूर :९९.८४औरंगाबाद :९९.९६मुंबई :९९.९६कोल्हापूर :९९.९२अमरावती :९९.९८नाशिक : ९९.९६ लातूर :९९.९६कोकण :१००

परीक्षेसाठी बसलेलेविद्यार्थी     :     ९,०९,९३१विद्यार्थिंनी  :     ७,४८,६९३एकूण        :     १६,५८,६२४

निकाल पाहण्यासाठी लिंक : www.result.mh-ssc.ac.inशाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in 

टॅग्स :ssc examदहावीResult Dayपरिणाम दिवसexamपरीक्षा