श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ, पवारांचे जिवलग मित्र लोकसभेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:27 AM2019-11-18T11:27:28+5:302019-11-18T11:29:00+5:30

लोकसभा अध्यक्षांकडून खासदार श्रीनिवास पाटील यांना सत्य आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.

Srinivas Patil took oath of MP in delhi, Sharad Pawar's best friend in Lok Sabha | श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ, पवारांचे जिवलग मित्र लोकसभेत 

श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ, पवारांचे जिवलग मित्र लोकसभेत 

googlenewsNext

नवी दिल्ली - साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदारश्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच खासदार दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच घेण्यात आलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव करुन श्रीनिवास पाटीलही तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत. 

लोकसभा अध्यक्षांकडून खासदार श्रीनिवास पाटील यांना सत्य आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे. पाटील हे यापूर्वीही दोनवेळा खासदार राहिले असून सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी विकासाची कामं करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे म्हटले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो, असे पाटील यांनी आपल्या विजयानंतर म्हटले होते. दरम्यान, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात केलेला प्रवेश लोकांना रुचला नाही. तसेच, शरद पवारांची पावसातील सभा साताऱ्यातील निवडणुकीत निर्णायक ठरल्याचंही अनेकांच मत आहे. 
 

Web Title: Srinivas Patil took oath of MP in delhi, Sharad Pawar's best friend in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.