कीटकनाशकांच्या मिश्रणामुळे फवारणी बळी , प्रयोगशाळेचा निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 05:00 IST2017-11-10T04:59:20+5:302017-11-10T05:00:00+5:30
फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे.

कीटकनाशकांच्या मिश्रणामुळे फवारणी बळी , प्रयोगशाळेचा निष्कर्ष
यवतमाळ : फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन दोन डझन शेतकºयांना जीव गमवावा लागला. ७००हून अधिक जणांना बाधा झाली. त्यामुळे सर्वत्र भीतीचे तसेच तणावाच वातावरण निर्माण झाले आहे. हे नेमके कशामुळे घडले, हे शोधण्यासाठी मृत शेतकºयांचा व्हिसेरा व बाधित रुग्णांच्या रक्ताचे रक्त नमुने अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र ते सर्व ‘निगेटीव्ह’ आले आहेत.
अर्थात व्हीसेरा व रक्तात कुठेच विषाचे अंश आढळून आलेले नाहीत. कंपन्या राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत जे नमुने पाठवितात, ते उत्तम दर्जाचे असतात. त्यात कुठलीही भेसळ करण्यात आलेली नसते. पण बाजारात उपलब्ध होणाºया कीटकनाशकांमध्ये मात्र तसा दर्जा आढळून येत नाही. त्यामुळे कीटकनाशकांची तीव्रता वाढविण्यासाठी शेतकरी दोन-तीन कीटकनाशके एकत्र करतात व हेच त्यांच्या जीवावर बेतल्याचे दिसते.
पैसे वाचवण्याचा प्रयोग जिवावर बेततो
न्यायवैद्यक प्रयोगशाळा अमरावतीचे उपसंचालक
डॉ. विजय ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात प्रति बाटली ५० ते ७० रुपये या दराने फवारणी केली जाते. त्यामुळे एक शेतमजूर दिवसात ३० ते ४० बाटल्या कीटकनाशक फवारतो. फवारणीचा खर्च कमी व्हावा म्हणून शेतकरी तीन ते चार कीटकनाशके एकत्र करतात. त्यामुळे ते नाशक अधिक जहाल होते. त्याची बाधा सर्वप्रथम फवारणी करणाºयाला होते; शिवाय फवारणीपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात नाहीत.