घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 19:12 IST2021-02-24T19:12:06+5:302021-02-24T19:12:44+5:30
आम्ही सारे शिवप्रेमी आयोजित तसेच वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड संयोजित राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
टाकरखेड़ा संभू (अमरावती) : आम्ही सारे शिवप्रेमी आयोजित तसेच वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड संयोजित राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी तीन दिवसांत एकूण २९५० स्पर्धक सहभागी झाले. मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वाशिम, यवतमाळ ,अकोला, बुलडाणा, अमरावती या सर्व जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
‘शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात’ हे ब्रीद असलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या १० मावळ्यांना बक्षिसे व सहभागींना गौरवपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर पात्र स्पर्धक यांना लेख स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार असून त्याआधारे एकूण गुणांकन होणार आहे. या स्पर्धेचा निकाल पुढील एक महिन्यात लागणार असून त्याच वेळी बक्षीस वितरण होणार असल्याचे स्पर्धेचे मुख्य संयोजक तळवेल (ता. चांदूर बाजार) येथील तुषार देशमुख व आयोजन समितीच्या सदस्यांनी कळवले आहे.