शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:19 IST

मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा

मिरज : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली, मताचे राजकारण करणारा काँग्रेस व राष्ट्रवादी हा पक्ष व हिंदुत्वाचे नाव घेऊन राजकारण करणारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी उद्धवसेना या पक्षांनी सत्तेसाठी आपली विचारधारा सोडल्याने या पक्षात फूट पडल्याची टीका आमदार विनय कोरे यांनी केली. मिरजेत आयोजित जनसुराज्य पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे बोलत होते.महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंक काम करणारा जनसुराज्य पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती भक्कमपणे निवडणूक लढवेल. जागावाटपही योग्य प्रकारे होईल. जेथे एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक असतील त्याठिकाणी राज्यस्तरावरील नेते वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेतील, असेही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.जनसुराज्य पक्ष सर्वसामान्य लोकांचा, गोरगरीब व दीनदलितांचा पक्ष आहे. राज्यात एक ताकदवान पक्ष म्हणून जनसुराज्य पक्ष ओळखला जातो. जनसुराज्य पक्ष राज्यात वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे, असे सांगून आमदार अशोक माने पुढे म्हणाले, कार्यक्षम युवानेते समित कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढत आहे.सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीतील पदाधिकारी जनसुराज्य पक्षात येत आहेत. जनसुराज्य पक्ष हा चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे, असे सांगून जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम पुढे म्हणाले, जातिभेद न करता विकासाच राजकारण करणारा जनसुराज्य पक्ष आहे. सांगली जिल्ह्यात १०० कोटींपेक्षा जास्त विकासनिधी मिळवून दिला आहे. मिरजेत निखिल कलगुटगी यांच्या बाबत दुर्दैवी घटना घडली. कलगुटगी कुटुंबीयांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत, असेही समित कदम यांनी यावेळी सांगितले.जनसुराज्य युवा शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला. यावेळी आमदार अशोकराव माने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नेते महादेव कुरणे, अमित कदम, आनंदा देवमाने, आनंदसागर पुजारी, पंकज म्हेत्रे, विजय माने, समीर मालगावे, जयश्रीताई कुरणे, अनिताताई कदम, मोनिका माळी, तमन्ना सतारमेकर, ज्योती मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ideology Abandonment Caused Splits in NCP, Shiv Sena: Vinay Kore

Web Summary : MLA Vinay Kore criticized NCP, Congress, and Shiv Sena (Uddhav) for abandoning ideology for power, causing splits. He spoke at a Jansurajya Party event, highlighting the party's integrity and promising a strong alliance in upcoming elections. Jansurajya is committed to development and stands with the Kalgutgi family, stated Samit Kadam.