पाच लाख कोटींच्या प्रलंबित योजनांना गती
By Admin | Updated: August 25, 2014 03:25 IST2014-08-25T03:25:21+5:302014-08-25T03:25:21+5:30
मागील काही वर्षांपासून रेल्वेचे पाच लाख कोटींचे शेकडो प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांना गती देण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे

पाच लाख कोटींच्या प्रलंबित योजनांना गती
औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून रेल्वेचे पाच लाख कोटींचे शेकडो प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांना गती देण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे. त्याचप्रमाणे देशातील आठ हजार रेल्वे फाटकांवर यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी येथे दिली.
औरंगाबादमध्ये बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिन्हा म्हणाले, देशातील दुहेरीकरणाच्या ३६ योजनांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. त्यात राजकारण होणार नसल्याची काळजी आम्ही घेत आहोत. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यादृष्टीने चार हजार महिला पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. महिलांच्या प्रत्येक डब्यात एक महिला शिपाई असायलाच पाहिजे, अशी सक्ती करण्यात येईल. मुंबईसह देशभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेचा व्याप खूप मोठा असून, ९० दिवसांचा काळ खूपच कमी आहे. देशभर रेल्वेत स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)