शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:09 IST

विधान परिषदेतील दहा सदस्यांच्या निरोपावेळी अजित पवारांची टोलेबाजी

मुंबई : सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर यांच्यासह दहा आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाल संपत आहे. या सदस्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक सदस्याची खास ओळख सांगत केलेल्या राजकीय फटकेबाजीने सभागृहाचे वातावरणच बदलून टाकले. एकीकडे शुभेच्छा देतानाच भावी राजकीय घडामोडींवर सूचक भाष्यही केले.अजित पवार यांनी सभापतींच्या क्रिकेट प्रेम आणि कौशल्याचे किस्से सांगत भाषणाची सुरूवात केली. यानंतर प्रवीण दरेकरांना शुभेच्छा देताना राजकीय चिमटे काढले. सहकारात काम करणाऱ्या प्रवीण दरेकरांना गुंतवणूक कधी करायची आणि कधी काढायची, याची पक्की जाण आहे. एकेकाळी मनसेत राज ठाकरे यांच्याजवळ होते. योग्यवेळी तिथून बाहेर पडत भाजपमध्ये दाखल झाले आणि भाजप नेतृत्वाच्या जवळ पोहोचले. अशी किमया प्रत्येकाला जमत नाही. नरेंद्र मोदींच्या काळात भाजपने जितकी प्रगती केली, त्यापेक्षा जास्त वेगात दरेकरांनी प्रगती साधली. त्यांना हे कसे जमते, असा प्रश्न भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनाही पडला आहे, असे अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.  प्रसाद लाडही असेच आहेत. आमच्याकडे होते तेव्हा आमच्या जवळ, आता भाजपमध्ये श्रेष्ठींच्या जवळ आहेत. त्यांच्या नावात प्रसाद पण आणि लाडही. कोणी कोणाला प्रसाद दिला आणि कुणाचे लाड केले हे सांगता येत नाही, असे  पवार म्हणाले आणि लाडांसह सगळेच हसू लागले. सदाभाऊ खोत यांच्याबद्दल पवार म्हणाले, शेतकरी संघटनेतून पुढे आलेले सदाभाऊ भाजपमध्ये आले आणि राजू शेट्टींसोबतचा हात सुटला. आता ते एकटेच खूप पुढे जात आहेत. अलीकडे आमच्या जयंत पाटील यांच्याशी खूप वेळ बोलत असतात. आधी या दोघांचे फार काही जमायचे नाही. आता इतका वेळ काय बोलत असतात कुणाला माहीत, असे पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

...आणि अजित पवारांवर एसआयटी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि सुनील गावस्कर यांचे क्रिकेट प्रशिक्षक एकच होते. एका अपघातामुळे क्रिकेटऐवजी ते राजकारणात आले. त्यामुळे देश एका चांगल्या क्रिकेटपटूला मुकला. आपल्या शेवटच्या सामन्यात निंबाळकरांनी ८२ धावा काढल्या. १८ धावांनी त्यांचे शतक हुकले. क्रिकेटचे हुकलेले शतक ते आपल्या आयुष्यात नक्की पूर्ण करतील, अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या. यावर ८२ धावांची ही माहिती तुम्हाला कशी कळली, यावर एसआयटी लावली पाहिजे, असे सभापती आपल्या उत्तरात म्हणाले. यावर, सीबीआय लावा, असे खालून उत्तर आले. त्याला आमच्या सभागृहात एसआयटी, निलंबनच चालते सीबीआय वगैरे नाही, असे उत्तर सभापतींनी देताच अजित पवारांसह सगळेच हास्यात बुडाले. पवारांनी सांगितले कुणाचे किती...  दहा सदस्य निवृत्त होत आहेत. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार पुन्हा निवडून येणार, हे पक्के आहे. बाकी उरलेला एक जो जोर लावेल त्याचा आहे, असे म्हणताना प्रसाद लाड यांच्याकडे अजित पवारांची नजर होती. त्यामुळे ४-१-२-२च्या फॉर्म्युल्यात टि्वस्ट असेल, असाच सूचक इशारा पवारांनी दिला.  निवृत्त होणारे दहा सदस्य सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, सुरजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौड यांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपत आहे. तर रवींद्र फाटक जून महिन्यात निवृत्त होत आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपा