शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वाहनांची विशेष तपासणी मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:35 IST

८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची राज्यभर तपासणी केली जाणार आहे.

ठळक मुद्दे योग्यप्रकारे कार्यवाही न झाल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाईतपासणी काटेकोरपणे न केल्याचे आढळून आल्याने ३७ वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय वाहन रस्त्यावर चालण्यास धोकादायक असणे याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश

पुणे : योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची राज्यभर तपासणी केली जाणार आहे. तसेच याबाबत योग्यप्रकारे कार्यवाही न झाल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून वाहनांची तपासणी करून ठराविक कालावधीसाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. पण ही तपासणी काटेकोरपणे न केल्याचे आढळून आल्याने ३७ वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने यासंदभार्तील एका जनहित याचिकेमध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर परिवहन विभागामार्फत सध्या करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत दि. ७ सप्टेंबर रोजीच्या आदेशात असमाधान व्यक्त केले आहे. यापार्श्वभुमीवर परिवहन विभागाने वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात दि. ८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान ही मोहिम राबविली जाईल. मोहिमेमध्ये वाहनास वैध योग्यता प्रमाणपत्र असूनही वाहन सदोष आहे, असे आढळल्यास या वाहनाचे प्रमाणपत्र निलंबित केले जाईल. योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने जवळच्या दुरूस्ती केंद्रांमध्ये अटकावून ठेवली जातील. ही वाहने रस्त्यावर चालण्यासाठी योग्य करून संबंधित वाहन मालकाने अधिकाºयांसमोर सादर करावी लागतील. त्यानंतर तपासणी करून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नुतणीकरण केले जाईल. क्षेत्रीय कार्यालयांमधील वायुवेग पथकांनी परिवहन संवगार्तील वाहनांच्या तपासणीमध्ये योग्यता प्रमाणपत्र नसणे अथवा योग्यता प्रमाणपत्र असूनही वाहन रस्त्यावर चालण्यास धोकादायक असणे याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या सुचनांची योग्यप्रकारे कार्यवाही न झाल्यास कार्यालयप्रमुख शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.-------------------  

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरRto officeआरटीओ ऑफीसMaharashtraमहाराष्ट्र