शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काय देता ते बोला, मगच नावे देतो! - शिवसेना

By admin | Updated: November 8, 2014 04:04 IST

महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेनेला काय देता ते अगोदर सांगा मगच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता दोन नावे देतो,

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेनेला काय देता ते अगोदर सांगा मगच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता दोन नावे देतो, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.केंद्र सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला केवळ एक मंत्रिपद आले. अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योगासारखे कमी महत्त्वाचे खाते दिले. आता मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश प्रभू यांचे नाव शिवसेनेने द्यावे, असा आग्रह भाजपाने धरला आहे. परंतु शिवसेनेकडून अद्याप कोणाचेही नाव गेलेले नाही. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर आपल्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येतील, अशी भीती शिवसेनेला वाटते. त्यामुळे महाराष्ट्रात काय देणार ते स्पष्ट करा, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे.केंद्र सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून आपली वर्णी लागावी, यासाठी खासदार ‘मातोश्री’ला साकडे घालत आहेत. कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाकरिता बरीच चुरस आहे. अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव अढळराव-पाटील, आनंदराव अडसूळ असे अनेक जण इच्छुक असून, यापैकी काहींनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेनेतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तर राज्यमंत्री पदासाठी भावना गवळी, संजय राऊत यांची नावे चर्चेत आहेत. मंत्रिपद देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले होते. अजून आपल्याला दूरध्वनी आलेला नाही. परंतु शनिवारपर्यंत दूरध्वनी येईल, अशी अपेक्षा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)