रब्बीच्या 68 टक्के क्षेत्रवर पेरण्या
By Admin | Updated: November 14, 2014 23:41 IST2014-11-14T23:41:06+5:302014-11-14T23:41:06+5:30
बारामती तालुक्यात सध्या काही भागांत रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत.

रब्बीच्या 68 टक्के क्षेत्रवर पेरण्या
बारामती : बारामती तालुक्यात सध्या काही भागांत रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. गुरुवार्पयत (दि. 13) एकूण रब्बी हंगामाच्या 59,4क्क् हेक्टर क्षेत्रपैकी 4क्,1क्3 हेक्टर क्षेत्रवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती बारामती तालुका कृषी विभागाने ‘लोकमत’ला दिली.
तालुक्यात रब्बीच्या 68 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तसेच रब्बीच्या पेरण्यांमध्ये येत्या काही दिवसात वाढ होऊ शकते, अशी शक्यताही कृषी विभागाने व्यक्त केली.
जिरायती भागातील मालदांडी ज्वारीच्या पेरण्या अल्प प्रमाणात झाल्या आहेत. पाणी टंचाईमुळे पेरण्या कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. थंडीमध्ये या भागात हमखास गव्हाचे पिक घेतले जाते.
मात्र अद्याप म्हणावी अशी थंडी न पडल्याने गहू पिकाच्या पेरण्या लांबलेल्या आहेत. पुरेशा प्रमाणात थंडी पडल्यास गहू पिकाच्या पेरण्या समाधानकारक प्रमाणात होतील, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणो ऊस तोडणी कामगारांनी केलेल्या संपामुळे उसाचा हंगामाला उशिराने सुरूवात झाली. उसाचे पिक गेल्यानंतरच मोकळ्य़ा झालेल्या शेतात या परिसरातील शेतकरी गव्हाच्या पेरण्या करीत असतो. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतक:यांना जवळपास तीन महिने पावसाची प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर देखील आलेल्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होते.
खरिपातील शेती पिकांसह चारा पिकेही अडचणीत आली. कांद्यासारख्या नगदी पिकांची देखील लागवड करणो जिरायती भागातील शेतक:यांना शक्य झाले नाही. लांबलेल्या पावसाचा येथील कृषी चक्रावर विपरीत परिणाम झाला. कमी पाण्यात पिके जगवण्याची कसरत शेतक:यांना करावी लागत आहे. बारामती तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, मका, हरभारा, सूर्यफुल, कांदा, भाजीपाला, चारा पिके आदींच्या लागवडी झालेल्या आहेत. गळीत धान्य पिकांमध्ये सूर्यफुल आणि करडई पिकांच्या लागवडही काही हेक्टर क्षेत्रवर झालेल्या आहेत. (वार्ताहर)
भाजीपाला पिके लागवड क्षेत्र(हेक्टरमध्य)
कांदा 4145.क्
टोमॅटो 218.क्
बटाटा 43.क्
फुलकोबी 16.क्
पानकोबी 4.5
वांगी 239.3
भेंडी 54.क्
सिमला मिलची 18.5
दुधी भोपळा 11.8
दोडका 17क्.क्
रब्बी हंगामातील पीकनिहाय आकडेवारी
पिके लागवड क्षेत्र (हेक्टर मध्ये)
ज्वारी 36,645.क् गहू 745.क्
मका 1555.क् तृणधान्य 129.क्
हरभारा 979.क्
कडधान्य 6.क्
एकूण अन्नधान्य 4क्क्59.क्
सूर्यफुल 36.क्
इतर गळीतधान्य 8.क् एकूण गळीतधान्य 44.क्
एकूण रब्बी हंगाम 4क्1क्3.क्