दक्षिण अमेरिकेची जलकुंभी ठरली डोकेदुखी
By Admin | Updated: July 9, 2016 18:28 IST2016-07-09T18:28:38+5:302016-07-09T18:28:38+5:30
दक्षिण अमेरिकेतील एमॅझोन खो-यातील जलपर्णी राणी व्हिक्टोरियाला ब्राझीलच्या राजदुताने काचेच्या भांड्यात वनस्पतीची जांभळ्या व निळ्या रंगाची फुले भेट म्हणून दिली होती

दक्षिण अमेरिकेची जलकुंभी ठरली डोकेदुखी
>काशिनाथ वाघमारे / ऑनलाइन लोकमत -
दुषीत पाण्यातच फोपावते वनस्पती : कंबर तलावाचे विद्रुपीकरण थांबता थांबेना
सोलापूर, दि. 09 - दक्षिण अमेरिकेतील एमॅझोन खो-यातील जलपर्णी राणी व्हिक्टोरियाला ब्राझीलच्या राजदुताने काचेच्या भांड्यात वनस्पतीची जांभळ्या व निळ्या रंगाची फुले भेट म्हणून दिली होती. आज ही जलपर्णी केवळ सोलापूरकरांसाठीच नाही तर भारतातील सर्व नद्या व तलावांची डोकेदुखी ठरली आहे.
विशेषत: ही वनस्पती केवळ दुषीत पाण्यातच वेगाने पसरते. या जलपर्णीमुळे कंबर तलावाच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न सुटता सुटेनासा झाला आहे. तसे पाहता या जलपर्णीचे मूळ उगम स्थान हे आफ्रिकेत आहे. तिच्यातून डासांची उत्पत्ती होते. या डासांपासून हत्तीपाय आजार जडतो़ अशीही जलपर्णी तीन माध्यमातून ती तलावात पसरत गेली. फुलांच्या माध्यमातून, फांद्या आणि पानांच्या माध्यमातून व तिच्या सुक्ष्म बियांपासून अशा तीन माध्यमातून पसरली. तिच्या बिया पाण्याच्या तळाशी जावून १५ ते २० वर्षे जिवंत राहू शकतात, यामुळेच जलपर्णी वारंवार पसरत राहिली आणि तिचे रुपांतर आता जलकुंभीत झाले आहे.
जिथे दुषीत पाणी तिथेच ती उगवते हे या वनस्पतीचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म समजावे. रासायनिक कारखान्यांमध्ये रासायनिक दुषीत पाणी शुद्ध करण्यासाठी तिचा वापर करता येवू शकतो. कारण रासायनिक दुषीत पाण्यातील विषारी घटक शोषूण घेण्याची प्रचंड शक्ती या वनस्पतीमणध्ये आहे.
कशी आली भारतात जलपर्णी
१९ व्या शतकात ब्राझीलच्या राजदुताने या जलपर्णीची निळ्या व जांभळ्या रंगाची आकर्षक फुले इंग्लंडची राणी व्हिक्टारियाला भेट म्हणून दिली होती. राणीने राजवाड्यातील तलावात व नद्यांमध्ये फुले मिळवण्यासाठी सोडली.
काय आहेत तोटे
* जलपर्णीच्या पाण्यावरील थरामुळे सुर्यकिरणे व ऑक्सीजन पाण्यात तळापर्यंत पोहचू शकत नाहीत़
* पाण्यातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते़
* पक्षांसाठी असणारे खाद्य ‘शेवाळ’वर्णीय वनस्पती निर्माण होत नाही़
* जलपर्णीच्या मुळांच्या पोकळीत डास अंडी घालतात़
* वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो़
नियंत्रणात आणता येते
* ऑस्ट्रेलियात या जलपर्णीच्या नायनाटासाठी एका किटकाची पैदास केली आहे.‘नियोचेटेनिया बुरुची’ (एन बुरुची) हा किटक फक्त आणि फक्त जलपर्णीच खातो़ हे किटक सोलापुरात आणले तर ५ ते १० वर्षात तिच्यावर नियंत्रण मिळवता येईल़ ऑस्ट्रेलियाचा यशस्वी प्रयोग सोलापूरात राबवण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. महापालिकेचे पथकाचे प्रयत्न जलकुंभी काढण्यासाठी आजपर्यंत अनेक सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानने प्रयत्न केले़ तेही काढून थकले़ याबाबत जनजागृती खूप झाली परंतू त्यापुढे जलकुंभीने साºयांनाच हतबल ठरवले आहे़ आता महापालिकेनेच ही जलपर्णी काढण्याची जबाबदारी स्विकारली़ यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन केले़ या उद्यान प्रमुख अजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकात जवळपास १० कर्मचारी कार्यरत आहेत़ गेल्या १५ दिवसांपासून हे पथक जलकुंभी काढून कंटाळले आहे.
सोलापुरात आढळते तीन प्रकारची जलकुंभी
१)वॉटर हायसिंग (इकॉर्निया)-बिया व पानापासून तयार होणारी वनस्पती
२)पिस्टीया (अळू वर्णिय वनस्पती) - या वनस्पतीला नर आणि मादी अशी वेगवेगळी फुले येतात
३)अझोला (अपुष्प वनस्पती)- पाण्यातील विषारी द्रव्य शोषूण बिनविषारी घटकामध्ये रुपांतर करते़ या वनस्पतीत नायट्रोजनचे प्रमाणात अधिक असते (जैविक खत निर्मितीसाठी उपयुक्त)
- कंबर तलावात पांढरी आणि गुलाबी रंगाची कमळे होती़ ड्रेनेजचे पाणी या तलावात सोडले गेले आणि कमळे नष्ट झाली़ तिथे उगवली जलपर्णी़ ही जलपर्णी सातत्याने काढणे इतका एकमेव उपाय आहे़ रसायनाने काढता येते परंतू जलचर प्राण्यांना त्यापासून धोका होवू शकतो़ ती पाण्यातून काढली तरी २४ तासात दुप्पटीने वाढते़ बायोलॉजीकल कंट्रोलर आहे परंतू बाहेर देशातून आणणे खर्चिक बाब आहे़ महापालिकेने यावर विचार करावा
डॉ़ राजा ढेपे, वनस्पती शास्त्रज्ञ़