शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

By ravalnath.patil | Updated: October 13, 2020 16:22 IST

Kangana Ranaut : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे.

ठळक मुद्देतुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवालमाझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या पत्रातून राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. याबाबत कंगनाने ट्विट केले आहे. राज्यपालांकडून गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे, याबद्दल चांगले वाटले. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडले. मात्र, राजनीतिकदृष्ट्या मंदिरं बंद ठेवली. बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे, असे कंगना राणौतने ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणौतने याआधी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारवरही बोचरी टीका केली होती. कंगना राणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत शिवसेनेशीही पंगा घेतला आहे. याशिवाय, कंगना राणौत मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे एका नव्या वादास तोंड फुटले होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे सरकारवर टीका केल्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवालराज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यामध्ये लॉकडाऊन शब्द केराच्या टोपलीत टाकायचा आहे असे तुम्ही म्हटले होते. मात्र तरीही अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळे उघडलेली नाहीत. एका बाजूला बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र प्रार्थनास्थळे बंदच आहेत. देव अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. अनेक शिष्टमंडळांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळं सुरू करण्याची मागणी केली आहे, असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे. याचबरोबर, राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. 'तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अयोध्येला गेला होतात. तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला भेट दिली. तिथे पूजाही केली. मग आता मंदिर सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?, असा खोचक सवाल कोश्यारींनी उपस्थित केला आहे.

माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - मुख्यमंत्रीराज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रानेच उत्तर दिले आहे. 'आपण पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, 'मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे, तो आपल्याला मान्य नाही का?,' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रbollywoodबॉलिवूड