सोनिया गांधी, डॉ मनमोहन सिंग आज नांदेडमध्ये
By Admin | Updated: July 14, 2016 08:40 IST2016-07-14T08:40:39+5:302016-07-14T08:40:39+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज सकाळी ११.१५ वाजता नांदेडला पोहचतील.

सोनिया गांधी, डॉ मनमोहन सिंग आज नांदेडमध्ये
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. १४ - डॉ. शंकरराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज सकाळी ११.१५ वाजता नांदेडला पोहचतील.
नियोजित वेळेपेक्षा तासभर उशिराने दौरा सुरु होत आहे. सर्व प्रथम गुरुद्वारा दर्शन त्यानंतर दुपारी १२.३० वाजता पुतळा अनावरण, १.१० वाजता सभा, दुपारी २.२० ते ३.२० असा तासभराचा वेळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे भोजनासाठी राखीव असणार आहे. त्यानंतर सोनिया गांधी व मनमोहन सिंग दिल्लीकडे रवाना होतील.