मंडणगडचे सुपुत्र वायूदलातील राजेंद्र गुजर शहीद
By Admin | Updated: July 7, 2017 13:46 IST2017-07-07T13:42:46+5:302017-07-07T13:46:16+5:30
जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळनगर गावचे सुपुत्र आणि भारतीय वायू दलातील जवान राजेंद्र यशवंत गुजर शहीद झाले.

मंडणगडचे सुपुत्र वायूदलातील राजेंद्र गुजर शहीद
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 7 - जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळनगर गावचे सुपुत्र आणि भारतीय वायू दलातील जवान राजेंद्र यशवंत गुजर शहीद झाले. अरूणाचलप्रदेशमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
वायू दलात पायलट फ्लार्इंग लेफ्टनंट पदावर राजेंद्र गुजर कार्यरत होते. अरूणाचल प्रदेशातील पापुम पारे जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वायू दलाचे हेलिकॉप्टर कार्यरत होते. विंग कमांडर एम. एस. ढिल्लन, पायलट फ्लाईट लेफ्टनंट पी. के. सिंग आणि राजेंद्र गुजर असे तिघेजण या हेलिकॉप्टरमध्ये होते.
आणखी वाचा
अरूणाचल प्रदेशापासून ३0 कि. मी. अंतरावर बुधवार ४ जुलै रोजी या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. त्यानंतर हे हेलिकॉप्टर कोसळले. गुरूवारी त्या तिघांचे मृतदेह सापडले.