कसा-याजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक 50 मिनिटे उशिराने

By Admin | Updated: February 4, 2017 11:34 IST2017-02-04T11:20:47+5:302017-02-04T11:34:39+5:30

मध्य रेल्वेवरील खर्डी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेले आहेत.

Somehow the railroad rolls down, the traffic delayed for 50 minutes | कसा-याजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक 50 मिनिटे उशिराने

कसा-याजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक 50 मिनिटे उशिराने

 ऑनलाइन लोकमत

कसारा, दि. 4 - मध्य रेल्वेवरील कसारा ते खर्डी रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डाऊन मार्गावरील रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक तब्बल 50 मिनिटे उशीराने सुरू आहे.
 
रुळाला तडे गेल्याने सकाळी 9.17 वाजताची कसारा येथे येणा-या लोकलला तब्बल पाऊण तास उशीर झाला, यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
 
तसेच काही गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे.  मध्य रेल्वेवरील सततच्या होणा-या बिघाडांमुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत.
 
 
 
 
 
 
 

Web Title: Somehow the railroad rolls down, the traffic delayed for 50 minutes