शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये काही धोके - कोहीरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:08 IST

Marathwada Watergrid: मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते  सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

 औरंगाबाद : मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले.

३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोहीरकर म्हणाले, वॉटरग्रीडमध्ये काही धोके आहेत. त्या योजनेत शेती, उद्योग, पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन आहे. विभागात ११ ते १२ मोठी धरणे आहेत. ती एकमेकांना जोडण्याची ही योजना आहे. भविष्यात यातील निम्म्या धरणांत पाणी असेल, तर ते कुठे आणि किती प्रमाणात द्यायचे. त्याचे वाटप होणे अवघड होईल. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नियोजन करावे लागेल. नाशिक, अहमदनगरमध्ये धरणे बांधली गेली. मोठ्या प्रमाणात धरणे बांधल्याने त्याचा परिणाम जायकवाडीवर झाला. असेच होत राहिले, तर जिल्ह्या-जिल्ह्यांत भांडणे होतील. 

सत्ताधारी मंत्री काय म्हणाले?रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जायकवाडीचे कालवे दुरुस्तीची मागणी केली. गोदावरी खोऱ्यातील बंधाऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी देण्यासह जायकवाडीवरील २ लाख हेक्टरऐवजी  अवघी ८० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येत असल्याचे सांगितले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगावमधील प्रकल्प मार्गी लावून मराठवाड्यातील सिंचनासाठी चर्चासत्र घेण्याचा प्रस्ताव मांडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मराठवाड्यात ४ लाख ७९ हजार सिंचनाचा ५,३३२ कोटींचा अनुशेष आहे. कायम अनुशेष असलेल्या जिल्ह्यांत जालना, औरंगाबाद आहेत. त्यासाठी पैसे मिळाले तर कामे होतील.  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा १६१ टीएमसी पाण्याची तूट असलेले खोरे आहे. पैनगंगा, मध्य गोदावरी उपखोऱ्यातून तूट भरून काढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणे भरलेली आहेत, परंतु पुन्हा दुष्काळ आला तर यासाठी जेवढी धरणे आहेत, त्यात कुठूनही आणा, मात्र पाणी द्या. तसे केले तरच पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी मराठवाडा करेल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार