शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'तुमचे भोंगे थांबवा, आमचे प्रश्न सोडवा!', मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 05:14 IST

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा एक डावच बनला आहे, असा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती केली.

मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक राजकीय भोंगे वाजविण्यात गुंतले आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा एक डावच बनला आहे, असा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती केली. तसेच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह प्रमुख राजकीय नेत्यांच्या नावाने धान्य, फळे आणि मिठाची टोकरी पाठवली. शेतकरी धान्यच देऊ शकतो, त्याला तरी जागा आणि तुमचे राजकीय भोंगे थांबवून आमचे प्रश्न सोडवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. 

दुपारी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या पथकाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्च काढला. यात बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटनांसह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते. गांधीजींच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या नावाची धान्याची टोकरी गांधी पुतळ्याच्या पायरीवर ठेवण्यात आली. तसेच, प्रार्थनासभेतून राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि शेतकरी समस्यांकडे त्यांचे लक्ष जावो, अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थना सभेनंतर पोलिसांनी शेतकरी पथकाला ताब्यात घेत मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी चालीसा म्हटलीआज सगळीकडे महाआरती करण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे शेतकरी वेदनांच्या महाआरतीसाठी आम्ही मुंबईत आलो. राज्यातील सरकार ईडी आणि सीबीआयमध्ये अडकले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला कोणीच तयार नाही. जातीयवादी नेत्यांच्या तोंडाचे भोंगे बंद करण्यात आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्यात सरकार गुंतले आहे. राज्यात विजेचा, उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याबद्दल राजकीय नेत्यांपासून समाजातील नेतेही मौन बाळगून आहेत. त्यामुळे आज आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी चालीसा म्हटली. - विनायक पाटील, उस्मानाबाद 

शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे प्रश्न आणि वेदना वेगळ्या आहेत. तुमचे राजकीय भोंगे थांबवा. शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार थांबवा, तरुणांच्या प्रश्नांकडे बघा. पण, या सगळ्यांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठीच सत्ताधारी आणि विरोधकांनी भोंग्यांचा डाव रचला आहे. - माणिक कदम, परभणी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीMantralayaमंत्रालय