शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:10 IST

Maharashtra Local Body Election 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे.

मुंबई  - नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. बंडखोरीवर हा उपाय शोधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत विचारविनिमय केला. काही वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करण्यात आली. 

आमची ८० टक्के नावे अंतिम झाली आहेत, उद्यापर्यंत आणखी २० टक्के नावे ठरतील आणि १५ तारखेपर्यंत सर्व नावे निश्चित होतील, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. उमेदवारांच्या नावांची प्रदेश स्तरावरून मुंबईत घोषणा केली तर बंडखोरीचे पेव फुटेल. त्याऐवजी आधी सर्वच जिल्हा प्रभारींकडे बी फॉर्म पाठविण्यात आले असल्याने ज्यांना प्रदेशाकडून उमेदवारी दिली जाईल त्यांच्याकडे प्रभारी हे अर्ज सोपवतील आणि ते उमेदवार अर्ज भरतील, अशी रणनीती आखण्यात आल्याचे समजते. 

तरच आधी यादी जाहीर १७ तारखेच्या आत बहुतांश ठिकाणी बंडखोरी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले तरच आधी यादी जाहीर करा नाहीतर मुदत संपल्यानंतर ती जाहीर करा, असे मत ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे व्यक्त केल्याचीही माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेशप्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींमधील संभाव्य तीन-तीन नावे मागविण्यात आली. काही निवडक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ही नावे अजूनही निश्चित करण्यात आलेली नाहीत.मुख्यमंत्र्यांनी अशा जिल्ह्यांच्या अध्यक्ष/प्रभारींशी आज व्यक्तिश: चर्चा करून नावे तत्काळ पाठवा, घोळ घालू नका, असे सांगितल्याची माहिती आहे.  महायुतीच्या समन्वय समितीची संयुक्त पत्र परिषद १८ नोव्हेंबरला मुंबईत होईल.

काँग्रेसने आपले उमेदवार केले निश्चितस्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीनुसार काँग्रेस लढवणार असणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील सर्व उमेदवारांची नावे पक्षाने निश्चित केली आहेत. टिळक भवन येथे काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची दोन दिवसांची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे.ही आघाडी लक्षात घेऊनच पक्षाने सर्व उमेदवार निश्चित केले आहेत. ‘मनसे’शी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

महापालिका मतदार यादी २० रोजी प्रसिद्ध होणारराज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात तिसऱ्यांदा बदल केला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी महापालिका प्रशासन आता २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. तसेच या प्रारूप यादीवर २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. ५ डिसेंबर रोजी हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ जानेवारीला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ जानेवारी रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार या यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Strategy to Curb Rebellion: Candidate List After Application Deadline

Web Summary : To avoid rebellion in upcoming local elections, BJP plans to announce candidate lists after the application deadline. Eighty percent of names are finalized. Congress has finalized its candidates based on local alliances, while the state election commission has revised the schedule for publishing the municipal voter list.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा