शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीत राजू शेट्टींचा एकट्याचा आक्रोश- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:44 IST

खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी अभद्र युती केल्याचा आरोप

सातारा : ‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात राहिला नाही. बिनीचे सरदारही त्यांच्यापासून दुरावले आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आक्रोश करणार असल्याचे सांगत आहेत, वास्तविक, आक्रोश करायला त्यांच्या पक्षात ते एकटेच उरले आहेत,’ अशी टीका कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केली.सातारा येथे पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, ‘आघाडी सरकार १५ वर्षे सत्तेवर होते. त्या सरकारसोबत शेतकरी संघटनेने अखंडपणे संघर्ष केला. दूध, ऊस, कापूस, सोयाबीन या उत्पादनांना हमीभाव देण्याची मागणी करणाºया शेतकऱ्यांना तेव्हा गोळ्या घालण्यात आल्या. संघटनेचे अनेक कार्यकर्ते अजूनही कोर्टात हेलपाटे मारत आहेत. अनेक शेतकरी मरण पावले. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टींनी मात्र राजकारणात आपले भवितव्य टिकून राहावे, यासाठी प्रस्थापितांसोबत अभद्र युती केली. मी भाजपसोबत गेलो तर माझीच माणसे माझ्याविरोधात हत्यारासारखी वापरली. शेट्टींना शेतकºयांच्या प्रश्नाचं देणं-घेणं राहिलेलं नाही.’राजू शेट्टी आक्रोश यात्रेबाबत खोत म्हणाले, ‘अकरा प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी ते आता आक्रोश यात्रा काढणार आहेत. शेतकरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत, आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या एकट्याचाच आक्रोश सुरू आहे.नटसम्राट नाटकासारखी ‘खासदारकी देता का खासदारकी’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे.’राजू शेट्टी ज्या इव्हीएमविरोधात आंदोलन करायला उठले आहेत, त्या इव्हीएमच्या माध्यमातून ते दोनदा कसे काय निवडून आले. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची इच्छा असेल तर आमचा त्यालाही पाठिंबा राहील, असे स्पष्टीकरणही खोत यांनी केले.विधानसभेसाठी रयत क्रांती १२ जागांसाठी आग्रहीविधानसभा निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटना राज्यातील १२ जागांसाठी आग्रही आहे. सातारा जिल्ह्यातील कºहाड उत्तर, फलटण व माण-खटाव हे तीन मतदारसंघ भाजपकडे मागितले आहेत, असे मत सदाभाऊंनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत