शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरपंप; जमा-खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 07:27 IST

लोकसभा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकारकडून सादर करण्यात आला.

मुंबई : अंतरिम अर्थसंकल्पात शेतीला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही नवीन योजना राबविण्यात येत असून, ८ लाख ५० हजार नवीन सौर कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय सर्व उपसा सिंचन योजनांचे दोन वर्षांत सौर ऊर्जीकरण केले जाणार आहे. 

लोकसभा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकारकडून सादर करण्यात आला. चार महिन्यांसाठीचा हा अर्थसंकल्प असून, जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्व घटकांसाठी तरतूद आहे. पायाभूत सुविधांवर भरत देताना सिंचन, सार्वजानिक आरोग्य, शिक्षण, परिवहन, ऊर्जा आदींच्या विकाससाठी तरतूद आहे. शेतकरी, सामाजिक न्याय, तसेच अल्पसंख्याक घटकांशी संबंधित योजनांना गती देताना जमा-खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत केल्याचे दिसते.

सौरऊर्जाnशेतकऱ्याला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेंतर्गत ७ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट.nसुमारे ३७ हजार अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच.nडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा कुंपणासाठी अनुदान देणारnसन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रमखर्चाकरिता ऊर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटी रुपयांची तरतूद

सिंचन प्रकल्पn३९ सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करून २ लाख ३४ हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणारnबळीराजा जलसंजीवनी योजनेत ४६ प्रकल्प  पूर्ण झाले असून मार्च २०२५ पर्यंत आणखी १६ प्रकल्प पूर्ण होणारnकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक साहाय्यित ३,२००  कोटींचा प्रकल्पnवैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे ३.७१ लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभnविदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद

शेतकरी योजनांना भरीव तरतूदनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या ६ हजार कोटींच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता.कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास ३,६५० कोटी रु, पशू, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागास ५५५ कोटी फलोत्पादन विभागास ७०८ कोटींची तरतूद.

वंचितांसाठी तरतूदवार्षिक योजनेसाठी १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यात अनुसूचित जाती योजनेसाठी १५,८९३ कोटी आणि आदिवासी विकास उपयोजनेसाठीच्या १५,३६० कोटींचा समावेश आहे.

आदिवासींकरिता १५,३६० कोटीआदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या योजनांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १५,३६० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. बालकांच्या पोषणवाढीसाठी ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’, आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्रांची उभारणी करण्याकरिता ‘नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान’, ‘शबरी आदिवासी घरकूल योजना’, पाडे बारमाही रस्त्यांशी जोडण्याकरिता ‘भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना’, आदींसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

३२ गडकिल्ल्यांचे नूतनीकरणnशिवकालीन ३२ गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे.nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी २० कोटींची तरतूद.nधाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी देणार.

५० नवीन पर्यटनस्थळांचा होणार विकासराज्यातील पर्यटनवाढ आणि तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारकांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. राज्यातील ५० नवीन पर्यटनस्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार,  छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा-वेरुळ, नगर जिल्ह्यातील कळसूबाई-भंडारदरा, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे अंदाजित ३३३ कोटी ५६ लाख रुपये किमतीचा जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येणार आहे.जलपर्यटनाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील शिवसागर जलाशय, भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द जलाशय, तसेच जळगाव जिल्ह्यातील वाघुर जलाशय येथे नावीन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर (जि. जळगाव)  येथे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारणार. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाAjit Pawarअजित पवार