शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आषाढी यात्रेत सोलापूर जिल्हा परिषद करणार चंद्रभागेच्या तीर्थाचे ब्रँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 16:11 IST

पंढरपुरात आषाढी यात्रेची लगभग; मानकरी व महत्त्वाच्या व्यक्तींना होणार वाटप

ठळक मुद्दे८ ते १२ जुलैदरम्यान पंढरपुरात होणाºया आषाढी सोहळ्याची तयारी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूजिल्हा परिषदेकडे स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याची जबाबदारीयात्रा काळात पंढरपुरात ३२ दिंड्या व मानाच्या सहा पालख्या दाखल होतात

सोलापूर : आषाढी यात्रेत जिल्हा परिषदेतर्फे चंद्रभागेतील तीर्थाचे ब्रँडिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

८ ते १२ जुलैदरम्यान पंढरपुरात होणाºया आषाढी सोहळ्याची तयारी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. याबाबत ३0 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली होती. या बैठकीत प्रत्येक खात्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडे स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याची जबाबदारी आहे. या अनुषंगाने करावयाच्या तयारीबाबत डॉ. भारूड यांनी खातेनिहाय बैठका घेऊन जबाबदारी निश्चित केली आहे. यात्रा काळात पंढरपुरात ३२ दिंड्या व मानाच्या सहा पालख्या दाखल होतात. पालखी व दिंडी मार्गावरील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. मानाच्या पालखीबरोबरच्या ६ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध केलेल्या २0 टँकरमध्ये शुद्ध पाणी भरण्यासाठी साडेपंधरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

प्रशासकीय या तयारीबरोबर आषाढी यात्रेचे वैशिष्ट्य व इतर तीर्थक्षेत्रांप्रमाणे पंढरपूरचे महत्त्व ओळखून जिल्हा परिषदेतर्फे चंद्रभागेचे तीर्थ मानकरी व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वारी काळात चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर चंद्रभागेतील पवित्र तीर्थ अनेक जण बाटलीत भरून नेतात. देशातील इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या नद्यांचे महत्त्व सांगितले जाते व त्याचे तीर्थ तांब्याच्या पात्रात उपलब्ध करून दिले जाते. देवदर्शनानंतर भाविक हे तीर्थ घरी नेतात व पूजेच्या वेळी त्याचा वापर केला जातो किंवा वर्षभर पूजन केले जाते. याच धर्तीवर चंद्रभागेच्या तीर्थाचे महत्त्व भाविकांच्या लक्षात यावे म्हणून यंदा आषाढी यात्रेत हा नवीन प्रयोग केला जाणार आहे, असे डॉ. भारूड यांनी स्पष्ट केले. 

तीर्थांचे महत्त्व सांगणारचंद्रभागेच्या पात्रातील शुद्ध पाणी तीर्थ म्हणून तांब्याच्या भांड्यात भाविकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर यंदाच्या आषाढी यात्रेच्या पूजेसाठी येणाºया अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पालखी व दिंडीचे प्रमुख, पूजेचा मान मिळणाºया वारकरी दांपत्यास हे तीर्थ भेट देण्यात येणार आहे. यासोबत चंद्रभागेच्या तीर्थाचे महत्त्व स्पष्ट करणारी माहिती उपलब्ध केली जाणार आहे. 

कुंभमेळाव्याचा अनुभव- उत्तर प्रदेशात ३ ते ५ मार्च या कालावधीत झालेल्या कुंभमेळाव्याचा अभ्यास करण्यासाठी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची निवड शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने केली होती. उत्तर प्रदेश शासनाने स्वच्छताविषयक विविध उपक्रम भाविकांसाठी हाती घेतले होते. यासाठी वापरण्यात आलेले मनुष्यबळ, केलेल्या उपाययोजना, इतर विभागांशी केलेला समन्वय, आर्थिक तरतूद, जनजागृतीसाठी केलेल्या उपाययोजना, भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या स्वच्छताविषयक सुविधा यांचा त्यांनी अभ्यास केला. या अनुभवावरून आषाढी यात्रेत अनेक बदल दिसतील, असे डॉ. भारूड यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदWaterपाणी