सोलापूर : गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, 2 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 13:09 IST2016-08-09T13:09:16+5:302016-08-09T13:09:27+5:30
लकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न नाविंदगी फाटा (ता़ अक्कलकोट) येथे झाला.

सोलापूर : गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, 2 जखमी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ९ - चालकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न नाविंदगी फाटा (ता़ अक्कलकोट) येथे झाला. यात दोघेजण किरकोळ जखमी झाले असून प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर चोरटे पसार झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली़. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली़
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मंगळवार ९ आॅगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास एमएच १४ बीटी ०६९० या क्रमाकांची एसटी अक्कलकोटहुन हैद्राकडे जात होती़ या एसटीत एकूण ४५ प्रवासी होते़ यापैकी तिघां प्रवाशांनी नाविंदगी फाटयाचे तिकीटाची मागणी कंडक्टरकडे केली़ त्यानुसार कंडक्टरने तिकीट दिले़ नाविंदगी फाटा येताच चला नाविंदगी उतरा असे कंडक्टरने हाक देताच या तिघापैकी एकाने वाहन दिवटे यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली़ यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली़ यातील अन्य दोघां चोरट्यांनी संपूर्ण एसटी बसमध्ये चटणी फेकून गोंधळ माजविला़ यावेळी एसटी हैद्रा येथील सराफ यांच्याकडील सोने, चांदी, रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला़ मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला़ मात्र चोरटे व सराफाच्या झटापटीत सराफ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़