शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं...; म्हणाले, गोष्ट काळजाला चाटून गेली...! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:35 IST

Shahajibapu Patil : "आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजवळ तुमची गोटी असली पाहिजे."

ज्याने पाणी अडवले (सांगोल्याचे) त्याला खासदार म्हणून पाठवले आणि पाणी देणारा घरात बसून आहे. आपलं आपल्याला हाणून-हाणून घ्यावं वाटतं, असे म्हणत शहाजीबापू यांनी भर सभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतले. एवढेच नाही तर, "आज येथे एवढा सत्कार आहे जयाभाऊंचा आणि त्या माणसानं येथे हार घेतला नाही. गोष्ट काळजाला चाटून गेली माझ्या." असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. ते सांगोल्यात एका जाहीस सभेत बोलत होते.

सांगोला येथे शुक्रवारी (3 एप्रिल) रात्रीच्या सुमारास सर्वपक्षीय नेत्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार केला, यावेळी शेकापचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आदी उपस्थित  होते. शहाजीबापू म्हणाले, "काँग्रेस काय आपली शत्रू होती का? माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. जयाभाऊंचं गेलंय, रंजित दादांचं गेलंय. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जिवनभर पाण्यासाठी काँग्रेस पक्षातून झगडा दिला. दऱ्या खोऱ्यात माणूस फिरला. पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला साथ दिली नाही. मात्र ते जेव्हा शिवसेनेतून खासदार झाले, १९९५ ला शिवसेना-भाजपचं सरकार आलं, सर्वजण कागदं काढून बघा, टेंभू मंजूर केव्हा झाले? म्हैसाळ मंजुर केव्हा झाले? उजनी केव्हा मंजूर झाले? तुमच्या या सर्व योजना शिवसेना आणि भारतीय जनाता पक्षाच्या काळात मंजूर झाल्या आहेत."

पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, "या ठिकाणी कोण नव्हतं, विलासराव आले, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, राजारामबापू पाटील, बाळासाहेब  देसाई, पतंगराव कदम, अशी डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण, आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला, तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षानेच लावला हे मी तुम्हाला जाहीर सांगेन." 

राजकारणाच्या वाटा धरताना कोणत्या धरायच्या हे तुम्ही ठरवायला हवे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सल्ला देताना शहाजीबापू म्हणाले, "तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगारपक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय, एवढी बातमी आम्हाला आली की, दंडवत घालत तुमच्या घरी येतो आणि भाई गणपतरावजी देशूम यांच्या पत्नीचं आधी दर्शन घेतो आणि लहान असलात तरी तुमचंही दर्शन घेतो. आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजवळ तुमची गोटी असली पाहिजे."

पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, आता जयाभाऊ सांगेल त्याच चिन्हाला मतदान करायचे. आईची शपथ तुम्हाल... हात वर करा. देणार की नाही, खरं हात वर करा. ज्याने पाणी अडवले त्याला खासदार म्हणून पाठवले आणि पाणी देणारा घरात बसून आहे. आपलं आपल्याला हाणून-हाणून घ्यावं वाटतं, (शहाजीबापू यांनी भर सभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतलं). काय माणसं आहोत आपण, काय म्हणून केलं आपण हे, कशासाठी हे पाप केलं, आज येथे एवढा सत्कार आहे जयाभाऊंचा आणि त्या माणसानं येथे हार घेतला नाही. गोष्ट काळजाला चाटून गेली माझ्या." 

    

टॅग्स :SolapurसोलापूरJaykumar Goreजयकुमार गोरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा