शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आमदार प्रणिती शिंदेंच्या अडचणीत पुन्हा वाढ; क़ाय झाला कोर्टात निर्णय पहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:00 IST

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे न्यायालयात हजर; पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना घेराव घातल्याचे प्रकरण : प्रत्येक तारखेस हजर राहण्यास दिले न्यायालयाने आदेश

ठळक मुद्दे- पालकमंत्र्यांना घेराव घातल्याप्रकरणी आ़ प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होता- प्रत्येक तारखेस हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले- सरकारी वकीलांनी केली होती न्यायालयीन कोठडीची मागणी

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी न्यायालयात हजर झाल्या. प्रत्येक तारखेस हजर राहण्यास सांगून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांनी जामीन मंजूर केला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात २ जानेवारी २0१८ रोजी बैठक झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख बाहेर आले असता, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, करीम शेख आदी कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केला. त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस नाईक अजित देशमुख यांना धक्काबुक्की झाली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याच्या आणि पुराव्यात ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर अंतरिम जामीन देण्यास हरकत नाही असा युक्तिवाद करत म्हणणे दाखल केले. आमदार प्रणिती शिंदे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देऊन जामीन मंजूर केला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे,अ‍ॅड.विनोद सूर्यवंशी, अ‍ॅड.दत्ता गुंड यांनी काम पाहिले. 

न्यायालयीन कोठडीची मागणी- आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी न्यायालयात हजर झाल्या तेव्हा न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी आमदार प्रणिती शिंदे व चेतन नरोटे यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावे असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने प्रणिती शिंदे यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याचा आदेश केला; मात्र त्याचवेळी मूळ जामिनाचा अर्ज व अंतरिम जामिनाचा अर्ज आमदार प्रणिती शिंदे व चेतन नरोटे यांनी दाखल केला होता, त्यामुळे जामीन झाला. या प्रकरणी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, करीम शेख आदींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेCourtन्यायालयVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख