सोलापूर - शिक्षकावर चाकू हल्ला करून लाखो रुपये पळविले, ४ जखमी

By Admin | Updated: August 15, 2016 11:24 IST2016-08-15T11:23:36+5:302016-08-15T11:24:09+5:30

गमपूर (ता.मोहोळ) येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास दोन वेगवेगळया ठिकाणी धाडसी चोरी करीत शिक्षकांवर चाकूने हल्ला करून लाखो रूपयाचा ऐवज चोरून नेला

Solapur - attacked a teacher with a knife and looted millions, four injured | सोलापूर - शिक्षकावर चाकू हल्ला करून लाखो रुपये पळविले, ४ जखमी

सोलापूर - शिक्षकावर चाकू हल्ला करून लाखो रुपये पळविले, ४ जखमी

>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १५ -  बेगमपूर (ता.मोहोळ) येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास  दोन वेगवेगळया ठिकाणी धाडसी चोरी करीत शिक्षकांवर चाकूने हल्ला करून लाखो रूपयाचा ऐवज चोरून नेला व जाताजाता चोरटयानी चार जण बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. 
गावाजवळील शिक्षक कॉलनी  व पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला, शिक्षक कॉलनीतील साजीद अ मज्जीद शेख व त्यांची दोन मुले साबीर व अरशद तर पंपाजवळील हबीब अब्बन पठाण यांचेवर चोरटयांनी जीवघेणा हल्ला केला,पैकी साबीर व अरशद या भावंडावर पोट व पाठीवर गंभीर घाव पडलेले आहेत.  स्वतंत्रदीनादिवशी घडलेल्या घटनेमुळे  नागरिकांच्या  सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत.⁠⁠⁠⁠

Web Title: Solapur - attacked a teacher with a knife and looted millions, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.