शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८६ कोटींची साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:02 IST

एफआरपीचे ६०९ कोटी देणे; आधारभूत ३१०० रुपये क्विंटल दराने साखर विक्रीला परवानगी

ठळक मुद्देसाखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केलीएफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई

सोलापूर: केंद्र शासनाने ठरविलेल्या ३१०० रुपये क्विंटल आधारभूत किमतीनुसार सोलापूरउस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपयांची साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम कारखाने शेतकºयांचे देणे आहे.

  राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे असून स्वॉफ्ट लोन घेऊन एफआरपी देण्याची सवलत शासनाने दिली होती. एफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई करण्यात आली. तरीही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. त्यानंतर स्वॉफ्ट लोन उचलल्यानंतरही सोलापूर व उस्मानाबादच्या ३३ साखर कारखान्यांनी एफआरपी चुकती केली नसल्याने शासनाने शिल्लक साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत कारखान्यांना दिली आहे.

शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे. १५ मे रोजीच्या सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडील आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३१ व उस्मानाबादच्या १० अशा ४१ कारखान्यांकडे ३८ लाख २५ हजार ३०४ क्विंटल साखर शिल्लक आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३१०० रुपये  ठरवली आहे. शिल्लक साखरेची केंद्र शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपये इतकी किंमत होते. दोन्ही जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी १५ जूनच्या अहवालानुसार एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांची दिली नाही. शासनाने दिलेल्या सवलतीप्रमाणे कारखाने शिल्लक साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देत असल्याचे सांगण्यात आले. 

उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये  - उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १६ लाख ५० हजार ८७९ क्विंटल साखर असून त्याची आधारभूत किंमत ५११ कोटी ७७ लाख २४ हजार ९०० रुपये होते तर एफआरपीप्रमाणे १२५ कोटी ४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांचे देणे आहे.आधारभूत किमतीने साखर विक्री झाली तरीही ५१२ कोटी येतात व १२५ कोटी देणे असल्याने उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये आहेत.- सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २१ लाख ७४ हजार ४२५ क्विंटल साखर शिल्लक असून आधारभूत किमतीप्रमाणे त्याची किंमत ६७४ कोटी ७ लाख १७ हजार ५०० रुपये होते. २५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार ४८३ कोटी ६० लाख रुपये शेतकºयांचे देणे   आहे.

साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली आहे. त्यानुसार बºयाच कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे.  त्यातून शेतकºयांचे पैसे दिले जातील.  जूनअखेर विक्री झालेली साखर व दिलेल्या एफआरपीची आकडेवारी समोर येईल.- अविनाश देशमुखप्रादेशिक सहसंचालक सोलापूर (साखर) 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीagricultureशेती