सोले यांचा अर्ज दाखल
By Admin | Updated: May 30, 2014 01:08 IST2014-05-30T01:08:24+5:302014-05-30T01:08:24+5:30
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महापौर अनिल सोले यांनी गुरुवारी विभागीय उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

सोले यांचा अर्ज दाखल
शक्तिप्रदर्शन : फडणवीसांसह संचेती, पटोलेंची उपस्थिती
नागपूर : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महापौर अनिल सोले यांनी गुरुवारी विभागीय उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रारंभी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विधानभवन चौकातील गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालून सोले यांनी अभिवादन केले. त्यानंतर शेकडो पक्षकार्यक र्त्यांसह सोले अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पोहचले.
यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खा. अजय संचेती, खा. नाना पटोले, खा. हंसराज अहीर, खा. अशोक नेते, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, सुधीर मुनगंटीवार, शहर अध्यक्ष आ.कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे, विकास कुंभारे, नाना श्यामकुळे, नागो गाणार, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, माजी आ. अशोक मानकर, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, माजी अध्यक्ष संदीप जोशी, अविनाश ठाकरे, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. कल्पना पांडे, प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, संदीप जाधव, o्रीकांत देशपांडे, संजय भेंडे, प्रकाश तोतवानी, संजय बोंडे, राजेश बागडी, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, रमेश शिंगारे, भीमराव मातीखाये, अशोक धोटे,भोला बढेल, भूपेश थुलकर, रवींद्र भुसारी, महिला आघाडीच्या कीर्ती अजमेरा, रिना कुत्तरमारे, सोनबा मुसळे, अशोक तांदूळकर, धर्मपाल मेo्राम, हर्षिल गुप्ता, गजेंद्र पांडे यांच्यासह नगरसेवक, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)