पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या
By Admin | Updated: May 30, 2014 12:25 IST2014-05-30T12:25:44+5:302014-05-30T12:25:44+5:30
पुण्यात हत्येचे सत्र सुरुच असून पुण्यातील इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणा-या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या
ऑनलाइन टीम
पुणे, दि. ३० - पुण्यातील इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मूळचा पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी असलेला वरुण सेठी हा पुण्यातील इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरपदावर कार्यरत होता. गुरुवारी रात्री उशीरा वरुणचा मृतदेह म्हाळुंगे गावातील निर्जनस्थळी आढळला. मृतदेहाजवळील ओळखपत्रावरुन पोलिसांनी वरुणची ओळख पटवली. तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन वरुणची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पुण्यात हत्येची गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कॅटरिंग व्यावसायिक दलाराम राठोड यांची एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती.