शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

काँग्रेस व भाजपात ‘सोशल मीडिया वॉर’, विडंबन व्हिडिओंची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:19 IST

लोकसभा निवडणुका येऊ लागल्याने सोशल मीडियावरील प्रचाराचा धुरळा जोरात उडू लागला आहे. राफेल घोटाळ्याच्या ‘व्हिडिओ वॉर’नंतर आता ‘आझादी’ या नव्या व्हिडिओवरून काँग्रेस व भाजपा सोशल मीडियावर हातघाईवर आले आहेत.

- असीफ कुरणेकोल्हापूर : लोकसभा निवडणुका येऊ लागल्याने सोशल मीडियावरील प्रचाराचा धुरळा जोरात उडू लागला आहे. राफेल घोटाळ्याच्या ‘व्हिडिओ वॉर’नंतर आता ‘आझादी’ या नव्या व्हिडिओवरून काँग्रेस व भाजपा सोशल मीडियावर हातघाईवर आले आहेत.‘गल्ली बॉय’ या चित्रपटातील एका रॅप गाण्याचा विडंबन व्हिडिओ तयार करून काँग्रेस व भाजपा एकमेकांवर टीका करत आहेत. २०१६ मध्ये जेएनयू विद्यापीठ वादावेळी डब शर्मा याने ओरिजनल रॅप साँग तयार केले होते. त्याचे ‘विडंबन रॅप साँग’ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले आहे. दोन्ही पक्षांनी या विडंबनाचा व्हिडिओ टिष्ट्वटरवर शेअर केला. त्यावेळपासून काँग्रेसचा ‘डर के आगे आझादी’चा व्हिडिओ १ लाख २० हजारवेळा, तर भाजपचा ‘काँग्रेस से आझादी’ व्हिडिओ ७६ हजारवेळा पाहिला गेला. व्हॉटस्अ‍ॅपवरही हे दोन्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.काँग्रेसच्या व्हिडिओमध्ये सामाजिक असहिष्णुता, राफेल भ्रष्टाचार, बड्या उद्योजकांसोबत पंतप्रधानांचे संबंध, मॉब लिंचिंग, नोटाबंदी, वाढती बेरोजगारी, दलित अत्याचाराबाबत भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने टू-जी घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, रॉबर्ट वाड्रा प्रकरण, काँग्रेसमधील घराणेशाही आदी विषयांवरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. दोन्ही पक्षांनी आपल्याला अडचणीची ठरतील, अशी वाक्ये मात्र सोयीस्कररित्या टाळली आहेत. राफेल वादावरूनही काँग्रेस व भाजपाने एकमेकांवर टीका करणारे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले होते. भाजपाने राफेलचा व्यवहार समजावून सांगण्यासाठी कुलूप खरेदी करण्याचे उदाहरण देणारा व्हिडिओ बनविला. त्याला काँग्रेसने तसेच प्रत्युत्तर दिले होते. जेएनयू विद्यापीठातील ‘आझादी’च्या घोषणेवरून कन्हैयाकुमार विरोधात रान उठविणाऱ्या भाजपाने यावेळी मात्र त्यांच्याच घोषणाचा वापर असलेल्या ‘रॅप साँग’चा वापर करून काँग्रेसवर टीका केली आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९